घरदेश-विदेशअरे वा! चक्क मातीच्या ११ मजली इमारती

अरे वा! चक्क मातीच्या ११ मजली इमारती

Subscribe

विशेष म्हणजे मातीच्या या इमारतींवर पाऊस, वादळ किंवा चक्रीवादळाचा जरासुद्धा परिणाम होत नाही.

आजही देशाच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये मातीपासून तयार केलेली घरं पाहायला मिळतात. मातीच्या या घरांविषयी तुम्ही अनेकदा वाचलं किंवा ऐकलं असेल. मातीचे हे घर दिसायला कितीही टुमदार आणि सुंदर असलं तरी जोराचं वादळ किंवा पावसामध्ये ते कितपत टिकून राहील याबद्दल शंकाच असते. त्यामुळे सहसा मातीची घर बांधण्याची जोखीम आज-काल कुणी घेताना दिसत नाही. मात्र, जगात असं एक शहर आहे जिथे चक्क मातीच्या अनेक मजली इमारती आहेत. ‘शिबम’ असं या शहराचं नाव असून, ते युएईमधील येमन देशामधील एक शहर आहे. या शहरात मातीपासून बांधण्यात आलेल्या ११ मजली इमारती आहेत. विशेष म्हणजे मातीपासून बनवण्यात आलेल्या या इमारती वॉटर आणि विंडप्रुफ आहेत. थोडक्यात मातीच्या या इमारतींवर पाऊस, वादळ किंवा चक्रीवादळाचा जरासुद्धा परिणाम होत नाही. या वैशिष्ट्यामुळेच  शहराला वाळवंटातील ‘मॅनहॅटन’ किंवा ‘मातीचं शहर’ असं संबोधलं जातं. जगभरातील पर्यटकांसाठी या मातीच्या इमारती आकर्षणाचं स्थळ आहे.

ऐतिहासिक मातीचं शहर

‘शिबम’ शहराला एक खूप मोठा इतिहास आहे. उपलब्ध माहितीनुसार, इ.स. १५३० मधअये या शहरात प्रचंड महापूर आला होता. या महापूरात संपूर्ण शहर उद्ध्वस्थ झालं होतं. मात्र, त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा ‘शिबम’ शहराची नव्याने उभारणी करण्यात आली. शहर नव्याने बंधत असताना शहराची ओळख असलेल्या मातीच्या इमारती पुन्हा एकदा बांधण्यात आल्य़ा. मात्र, त्या बांधतेवेळी खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ज्यामुळे आता या इमारतींवर वादळ, पाऊस किंवा महापूराचा काहीच परिणाम होणार. इथल्या बहुतेक इमारती या ५ ते ११ मजली आहेत. शहरातील लोकवस्ती विरळ असली तरी इथले लोक मातीच्या या घरांची देखभाल अगदी मनापासून घेतात. सूर्यकिरण पडल्यानंतर सोनेरी रंग धारण करणाऱ्या मातीच्या या इमारती सर्वांचंच लक्ष वेधून घेतात.


पाहा – शॉपिंग मॉलमधला ३० फुटाचा पंखा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -