घरमहाराष्ट्रट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून ११ बॅग लंपास

ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून ११ बॅग लंपास

Subscribe

पुणे-जळगाव या खासगी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून प्रवाशांच्या बॅगा लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बस जळगाव येथील एमआयडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे.

पुणे-जळगाव या खासगी ट्रॅव्हल्सची डिक्की उघडून प्रवाशांच्या बॅगा लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पुणे-जळगाव या खासगी ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत प्रवाशांच्या बॅग ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील ११ बॅग चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी दोन प्रवाशांनी जळगाव येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

पुणे-जळगाव या खासगी ट्रॅव्हल्सच्या डिक्की उघडून प्रवाशांच्या ११ बॅगा लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे येथून निघालेली पर्पल ग्रॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस (एमएच १४ सीडब्ल्यू २०६) प्रवाशी घेऊन जळगावात येत होती. प्रवासी जसे आपले स्थानक आल्यानंतर उतरले. त्यावेळी त्यांनी आपली बॅग घेण्यासाठी डिक्की उघल्यानंतर डिक्कीतून ११ बॅग लंपास झाल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांनी चालक व क्लिनरला विचारणा केली. परंतु, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर ही खासगी बस थेट जळगाव येथील एमआयडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -