घरदेश-विदेशतेलंगणाच्या निकालावर काँग्रेसचा संशय

तेलंगणाच्या निकालावर काँग्रेसचा संशय

Subscribe

टीआरएसच्या निकालावर काँग्रेसने संशय घेतला असून त्यांनी पक्ष मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी केला आहे.

तेलंगणात पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत दिसत आहे. सध्याच्या आलेल्या अंदाजानुसार टीआरएसने सर्वाधिक ९० जागांवर आघाडी मारलेली दिसून येत आहे. मात्र दुसरीकडी यावर संशय व्यक्त केला जात आहे. टीआरएसच्या निकालावर काँग्रेसने संशय घेतला असून त्यांनी पक्ष मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी

तेलंगणात जो निकाल लागत आहे त्यावरुन मला संशय येत आहे. यासाठी आम्ही व्हीव्हीपॅटमशीनमधील मतदानाच्या स्लिप तपासणार आहोत. कारण आम्हाला इव्हीएम मशीनमध्ये संशय येत आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारही करणार आहे. कारण, टीआरएसचे नेते मतमोजणी आधीच निवडणूक कोण हरणार हे कसं सांगू शकतात ना म्हणून मला यावरुन संशय येत असल्याचे मत काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.

हे आहेत आघाडीवर

विधानसभेसाठी सिरसिला येथून टीआरएसचे केटी राव राव, बांसवाडा येथून श्रीनिवास रेड्डी आणि अदिलाबादमधून जोगू रमन्ना आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे रेवांत रेड्डी सध्या पुढे असून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी हे निवडून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -