घरमुंबईहाच ट्रेंड महाराष्ट्रातही पाहायला मिळेल - अशोक चव्हाण

हाच ट्रेंड महाराष्ट्रातही पाहायला मिळेल – अशोक चव्हाण

Subscribe

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का देत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

देशात पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हातात येऊ लागलेले असतानाच काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला मोठा झटका दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या राज्यांमध्ये भाजपला काँग्रेसने मात देत मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून आणले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण असून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांवर देखील या निकालांचे परिणाम दिसतील अशी आशा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, महाराष्ट्रात देखील हेच चित्र दिसेल, असा दावा देखील काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

हुकुमशाहीवर लोकशाहीचा विजय

या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होऊ लागल्यानंतर राज्य काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ‘या निवडणुकांमधलं यशाचं श्रेय हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना जातं’, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचसोबत भाजपच्या गेल्या ४ वर्षांच्या कार्यकाळावरही त्यांनी ताशेरे ओढले. ‘भाजपकडून विविध राज्यांमधील सत्ता काही मोजक्या उद्योगपतींसाठी वापरली जात होती. तिला आज लोकांनी नाकारलं आहे. हुकुमशाहीवर हा लोकशाहीचा विजय आहे. राजस्थानम, मध् प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसची आगेकूच नक्कीच चांगली आहे. लोकांचं काँग्रेसला समर्थन लाभलं आहे. शेतकरी कष्टकऱ्यांचा यामध्ये फार मोठा हात आहे. नोटबंदीसारख्या तुघलकी निर्णयाविरोधात देशानं स्पष्टपणे कौल दिला आहे. आज जो ट्रेंड या ३ राज्यांमध्ये दिसला, तोच ट्रेंड महाराष्ट्रातही पाहायला मिळेल,’ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

सेमीफायनलमध्ये भाजपला जनतेनं नाकारलं – राधाकृष्ण विखे पाटील

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्याप्रमाणेच विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपवर या पत्रकार परिषदेमध्ये शरसंधान साधलं. ‘सगळे म्हणत होते की ही लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल आहे. पण आता सेमीफायनलमध्ये भाजपला जनतेनं नाकारलं आहे हे सिद्ध झालं आहे’, असं विखे पाटील म्हणाले. ‘मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधले निकाल पाहिल्यानंतर आता जनतेमधली नाराजीची भावना दिसून आली आहे. २०१४ सालच्या निकालांनंतर जनतेमध्ये काँग्रेसचा विश्वासघात केल्याची भावना होती. मात्र आता जनतेने भाजपला नाकारलं आहे. त्यामुळे जनतेचा कौल भाजपनं स्विकारायला हवा,’ असं देखील विखे पाटील यांनी सांगितलं.

‘मोदींनी उरलेला वेळ लोकहितामध्ये घालवावा!’

दरम्यान, यावेळी भाजपनं गेल्या ४ वर्षात भाजपने दिलेल्या आश्वासनांचा देखील त्यांनी समाचार घेतला. ‘काळा पैसा परत आणणार होते, पण काळा पैसा आलाच नाही. पिवळ्या, जांभळ्या, निळ्या नोटा मात्र आल्या. रोजगाराचं आश्वासन दिलं. पण भाजपनं देशातल्या तरुणांचा अपमान केला आहे. शेतीमालाला दीडपट हमीभावाचं आश्वासन देखील पूर्ण झालं नाही. आता तरी मोदींनी आश्वासन देणं सोडून उरलेला वेळ लोकहिताची कामं करण्यात घालवावा’, असा टोला विखे पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला.

- Advertisement -

वाचा : Madhya Pradesh Elections 2018 : बसपा किंगमेकर? ७ जागी आघाडीवर

वाचा : Rajasthan Election 2018 : भाजप ७९, काँग्रेस १००

वाचा : Telangana Elections 2018 : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?

वाचा : Mizroam Election 2018: मिझो फ्रंट पुन्हा आघाडीवर

वाचा : Chhattisgarh Elections 2018 : छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -