घरदेश-विदेशLive Update : श्रीनगरच्या चानापोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Live Update : श्रीनगरच्या चानापोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Subscribe

श्रीनगरच्या चानापोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून पोलीस आणि सुरक्षा दलांकडून शोधमोहिमी राबवण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात १,५७३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ३९ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर २,९६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांचा विचार केला असता राज्यात सध्या २४,२९२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

नवाब मलिक यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईतले आहेत. देशाची सेवा करताना जेलमध्ये जाण्यासही मी तयार आहे. पण नवाब मलिक खोटं बोलत आहेत. मी दुबईला गेल्याची माहिती खोटी आहे. मलिकांनी केलेले सगळे आरोप निराधार आहेत. याप्रकरणी वरिष्ठांची परवानगी घेऊन कायदेशीर कारवाई करणार – समीर वानखेडे


अनन्या पांडेची एनसीबी चौकशी संपली असून तब्बल सव्वादोन तास तिची चौकशी सुरू होती. अनन्यासोबत तिचे वडिल चंकी पांडे देखील एनसीबी कार्यालयात गेले होते.


आर्यन खानला ३० ऑक्टोबरला न्यायालयीन कोठडी


अनन्या पांडे पिता चंकी पांडे यांच्यासह एनसीबी कार्यालयात पोहचली,


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अनन्या पांडेला आज दुपारी २ वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश


दिवाळीनिमित्त शाळांना १ ते २१ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी


आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची अंधेरीत धाड सुरु, याप्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरी देखील एनसीबीने धाड टाकली आहे.


१०० कोटी डोस देऊन भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २१ ऑक्टोबर २०२१ या दिवसाची इतिहासात नोंद ठेवली जाईल, सर्वांनी मिळून कोरोनाला हरवायचे, रुग्णांना आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार मिळणार, सेवाकार्य इन्फोसिस कंपनीचे आभार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार- पंतप्रधान नरेंद्र मोदी


आर्यन खानच्या जामीनावर मंगळवारी सुनावणी


मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय- बाळा नांदगावकर


भारताने ओलांडला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा


आर्यनल खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल, परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी हवाला ऑपरेटरला गुजरातमधून अटक, मेहसाना रेल्वे स्थानकात हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल याला अटक, परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून उद्योजकाकडून पैसे उकळल्याचा आरोप पटेलवर आहे.


शहीद पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबईतील नायगाव येथील हुतात्मा मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना मानवंदना


राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने महाविद्यालये सुरु झाली आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी २५ ऑक्टोबरपासून व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -