घरCORONA UPDATECoronavirus: कोरोनावरील उपचारांसाठी आता गंगेच्या पाण्याचा वापर? तज्ज्ञांचा खुलासा

Coronavirus: कोरोनावरील उपचारांसाठी आता गंगेच्या पाण्याचा वापर? तज्ज्ञांचा खुलासा

Subscribe

कोरोना विषाणूचे जगभरात थैमान सुरु आहे. यात बाधितांच्या संख्येने २० कोटींचा टप्पा पार केला. तर लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला. भारतातही कोरोनाचा कहर अद्याप सुरु आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात भारतातही कोरोना विषाणूविरोधात प्रभावी औषध निर्माण करण्यासाठी संशोधन सुरु आहे. या संशोधनादरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.

गंगा नदीच्या पाण्याने कोरोना विषाणू नष्ट होतोय

हिंदू धर्मात गंगा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नदीचं पाणी सर्वांत पवित्र मानले जाते. त्यामुळे तज्ज्ञांकडून आता कोरोनावरील उपचारांसाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करण्याच्य़ा दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी झालेल्या एका संशोधनात गंगा नदीच्या पाण्याने कोरोना विषाणू नष्ट होत असल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

ह्रषिकेशपासून ते वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची केली तपासणी

बीआरडी मेडिकल कॉलेजमधील व्हायरॉलॉजिस्ट अमरेश सिंह यांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लखनऊमधील नाल्यांतील सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळून आले होते. यानंतर विविध ठिकाणच्या नद्यांमधील पाण्याची चाचणी करण्याच आली. एम्सने ह्रषिकेशपासून ते वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी केली. मात्र कुठेही पाण्यात कोरोना विषाणू आढळून आला नाही. या महत्त्वाच्या माहितीनंतर आता तज्ज्ञांनी गंगा नदीच्या पाण्याचा वापर कोरोना उपचारांसाठी वापरण्यासाठी संशोधन सुरु आहे.

 गंगा नदीच्या पाण्यात बॅक्टोरियोफेज नावाचा विषाणू 

गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलजचे मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. अमरेश सिंह यांच्या माहितीनुसार, गंगा नदीच्या पाण्यात ‘बॅक्टोरियोफेज’ नावाचा एक बॅक्टेरिया आढळून आला. हा विषाणू इतर कोणत्याही विषाणूंना पाण्यात जगू देत नाही. मात्र ‘बॅक्टोरियोफेज’ हा विषाणू हानीकारक नाही. तो उलट हानीकारक विषाणूंना नष्ट करतो. ज्यामुळे गंगा नदीच्या पाण्यात कोरोनाही विषाणूही जगू शकत नाही.

- Advertisement -

बंगळुरुच्या आयआयएममधील एक निवृत्त प्राध्यापक एका एनजीओच्या मदतीने गंगाजलापासून कोरोनाविरोधी औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर अद्याप संशोधन सुरु असून या संशोधन समितीमध्ये डॉ. अमरेश यांचाही समावेश आहे. यात प्रामुख्याने बॅक्टोरियोफेजवर संशोधन करत आहेत. तसेच कोरोनाच्या काही रुग्णांवरही याची चाचणी सुरु करण्यात येत आहे. मात्र या चाचणीचे अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, कोरोनाविरोधात गंगाजलाच्या मदतीने कोट्यावधी रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे गंगाजलापासून कोरोनाविरोध औषध हे जगातील स्वस्त औषध ठरेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -