घरमहाराष्ट्रमुरुड तहसीलदार गमन गावीतांना १५ हजारांची लाच घेताना अटक

मुरुड तहसीलदार गमन गावीतांना १५ हजारांची लाच घेताना अटक

Subscribe

मुरुड तहसीलदार गमन गावीतांना लाच घेताना एसीबीने पकडलं आहे. कुळ वहिवाट कायद्याच्या जमिन फेरफार करण्यासंदर्भात गावीत यांनी १५ हजारांची लाच मागितली होती. ही लाच घेत असताना गमन गावीत आणि दोन कर्मचार्‍यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं. एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराला आपल्या जमीनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाटीचे ३२ ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसिलदार तथा शेतजमीन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती. त्यासाठी तक्रारदाराकडे मुरुड तहसीलदार गमन गावीत यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने थेट नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली. त्यानुसार या तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. बुधवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना या पथकाने तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचार्‍यांना रंगेहाथ पकडले. सदर प्रकरणाबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

- Advertisement -

आरोपी

१) गमन रामजी गावित, वय ५३ वर्षे, तहसीलदार, मुरुड जंजिरा, जि. रायगड
२)संदेश सदानंद वाळंज, वय ५२ वर्षे, शिपाई (महसूल शाखा) तहसीलदार कार्यालय
३) रेमनाथ शाम पाटील, वय ४७ वर्षे, शिपाई,
तहसील कार्यालय मुरुड जिंजीरा,

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -