घरदेश-विदेशग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना

ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना

Subscribe

देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर फटका बसलेला आहे. शहरांमध्ये असलेला कोरोना आता ग्रामीण भागात पोहचल्याने प्रशासनांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर दिला आहे. यासाठी आशा वर्कर्सची मदत घेतली जाणार आहे. तसंच आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट किट प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

- Advertisement -

काय आहेत सूचना?

  • प्रत्येक गावागावात जाऊन आशा वर्कर्सना सर्दी तापाची नोंद करावी लागणार
  • आशा वर्कर्ससोबत सॅनेटायझेशन आणि न्यूट्रिशन कमिटीही सोबत असणार
  • ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येतील त्यांना आरोग्य अधिकारी तपासणी करणार, यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.
  • कोरोना चाचणीनंतर आयसोलेशनमध्ये रहावं लागणार
  • अहवाल येत नाही तोपर्यंत आयसोलेशनमध्ये रहावं लागणार
  • लक्षण नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवशक्यता नाही. घरात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -