घरCORONA UPDATECovid-19 : कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या लहान मुलांवर घरीच उपचार कसे करावेत?...

Covid-19 : कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या लहान मुलांवर घरीच उपचार कसे करावेत? केंद्राच्या मार्गदर्शक सुचना

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या लहान मुलांवरील उपचारांसाठी मार्गदर्शक सुचना केल्या जाहीर

देशात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्ग वेगाने वाढत असून देशात दररोज लाखोंच्या घरात नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यात कोरोना विषाणुचे नवनवे व्हेरियंट देशात आढळत असल्याने आरोग्य व्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. यात भारतात आढळणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट वयोवृद्ध, प्रौढ आणि आता लहान मुलांसाठीही जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे कोरोना विषाणु आता लहान मुलांसाठीही घातक असल्याचे तज्ज्ञांनी दावा केला आहे. लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या लहान मुलांवरील उपचारांसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.

लहान मुलांमधील सामान्य लक्षणे –

१) ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, स्नायुदुखी, राइनोरिया, घसा खवखवणे, अतिसार आणि चव, वास कमी होणे इ.

- Advertisement -

२) काही मुलांच्या पचनसंस्थेत बिघाड आणि एटिपिकल लक्षणे आढळू शकतात.

३) तर काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इनफ्लेमेटरी सिंड्रोम ( Multi-System Inflammatory Syndrome) नावाचा एक नवा सिंड्रोम प्रकार आढळून येत आहे. यात मुलांना ३८ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक ताप, SARS CoV2 ची साथीची लक्षणे आणि इनफ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणे आढळून येत आहेत.

- Advertisement -

मुलांना कोरोना संसर्ग झाल्यास काय करावे ? 

१ ) लहान मुलांमध्ये कोरोना लक्षणांची वाढ आणि विषाणुचा तीव्रतेनुसार देखरेख करत उपचार करणे आवश्यक आहे.

२) कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या मुलांमध्ये घसा खवखवणे, राइनोरियासह खोकताना आणि श्वास घेताना त्रास होणे, तर काहींना अतिसारसारखी लक्षणे दिसू शकतात.

३) या मुलांना घरीच्या घरी होम आयसोलेशनमध्ये ठेवत रोगनिदानविषयक उपचार पद्धतीचा वापर करत घरीच उपचार केले जाऊ शकतात.

४) जन्मपासूनच हृदयविकार, फुफ्फुसासंबंधीत निगडीत जुने आजार, इतर अवयवांसंबंधीत गंभीर आजार आणि लठ्ठपणासारखे आजार असणाऱ्या मुलांवरही घरच्या घरी उपचार केला जाऊ शकतात.

 लक्षणे नसलेल्या , सौम्य लक्षणे असलेल्या मुलांवर घरीच उपचार कसे करावे?

१) ताप : लहान मुलांना ताप असल्यास पॅरासिटामॉलचा 10-15 mg/kg/डोस द्यावा. तसेच ४ ते ५ तासांनंतर पुन्हा एकदा द्या.

२) खोकला : लहान किंवा मोठ्या मुलांनाही कोरडा खोकला असल्यास मीठ टाकलेल्या गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

३) आहार : शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करा, तसेच शरीर सतत हायड्रेशन पाणी किंवा ज्यूसचे सेवन करा,

४) मुलांची काळजी घेणाऱ्या पालक आणि आयांनी आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.


कोरोनाचे भयानक युद्धासमोर न डगमगता पावले टाकली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -