घरदेश-विदेशCorona virus: कोरोनाचे आणखी एक नवीन लक्षण; WHOनं दिला इशारा

Corona virus: कोरोनाचे आणखी एक नवीन लक्षण; WHOनं दिला इशारा

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाच्या एका नव्या लक्षणाबाबत माहिती दिली असून, कोरोनाचे लक्षण गंभीर असल्याचं वर्णन करणारा इशारा जारी केला आहे.

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सरकारनं देशाला कोरोना निर्बंधमुक्त केलं आहे. शिवाय महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारनं मास्कमुक्त देखील केलं आहे. भारतातील कोरोनाची स्थिती सुधारली असली, तरी परदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाच्या एका नव्या लक्षणाबाबत माहिती दिली असून, कोरोनाचे लक्षण गंभीर असल्याचं वर्णन करणारा इशारा जारी केला आहे.

एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, NHS च्या ताज्या अपडेट केलेल्या यादीतून कोरोना व्हायरसचे एक लक्षण गायब आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत इशारा दिला आहे. थंडी वाजून येणं, सततचा खोकला, वास किंवा चव कमी होणं ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं, आजारी वाटणे, थकवा, वेदना, घसा खवखवणे, डोकेदुखी, नाक वाहणे, भूक न लागणे आणि अतिसार ही लक्षणं त्यात सूचीबद्ध केली आहेत.

- Advertisement -

अधिकृतपणे सूचीबद्ध नसलेले लक्षण म्हणजे भ्रम. रोग नियंत्रण केंद्र (CDC) आणि WHO या दोन्ही संस्थांनी भ्रम (गोंधळ) हे कोरोना व्हायरसचे लक्षण म्हणून सूचीबद्ध केले आहे. WHO च्या यादीनुसार, भ्रम हे ‘गंभीर लक्षण’ म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे आणि कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या भ्रमाला ‘ब्रेन फॉग’ असंही म्हटलं जातं. जे दीर्घ कोरोनाचे लक्षण आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचे लक्षण म्हणून ओळखलं जातं.

- Advertisement -

लाँग कोविडची लक्षणे:

  • लक्ष नसणे
  • विचारात अडचण
  • गोंधळ
  • विसरणे
  • मानसिक थकवा जाणवणे

हेही वाचा – श्रीलंकेत राजकीय हालचाली तीव्र, राष्ट्रपतीकडून आणीबाणी हटवण्याची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -