घरदेश-विदेशकोणत्या Corona Vaccine चा ६ महिन्यानंतर किती होतो परिणाम; बघा, ब्रिटिश संशोधनातून...

कोणत्या Corona Vaccine चा ६ महिन्यानंतर किती होतो परिणाम; बघा, ब्रिटिश संशोधनातून काय झाले उघड

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी वेगाने कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या लसीसंदर्भातील नुकत्याच समोर आलेल्या संशोधनामुळे नागरिकांचा चिंता वाढली आहे. या संशोधनातून अशे समोर आले की, केवळ ६ महिन्यांनंतर कोरोना लसीचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. कोविड लसीच्या दोन डोस नंतर, बूस्टर डोस देखील घेणं आवश्यक असल्याचे सांगून त्यावर संशोधनात भर देण्यात आला आहे ब्रिटनमध्ये हे संशोधन Pfizer ची Biotech आणि Oxford ची AstraZeneca कोरोना लसींबाबत करण्यात आले आहे.

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, फायझरची लस कोरोनाला हरवण्यासाठी ८८ टक्के प्रभावी आहे. परंतु दोन्ही डोस घेतल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनंतर त्याचा परिणाम ८८ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांवर येतो. यूकेच्या ZOE COVID संशोधनात हे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस ७७ टक्के प्रभावी आहे. या लसीचा परिणाम चार ते पाच महिन्यांनंतर ६७ टक्क्यांपर्यंत राहतो असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

ZOE लिमिटिडचे सह-संस्थापक टीम स्पेक्टर यांनी असे सांगितले की, येत्या हिवाळ्यात कोरोना लसींचे संरक्षण ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. वृद्ध लोक आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये हे घडण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, ब्रिटन आणि अनेक युरोपियन देश कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये कोविड लसीचा तिसरा डोस दिला जाऊ शकतो. यावर अमेरिकाही याचा विचार करत आहे. जपानने कोरोनाच्या मॉडर्ना लसीचे काही डोस परत घेतले आहेत. कुपीमध्ये काहीतरी सापडल्याने जपानने असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे, वेळेत सावध होऊन नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -