घरदेश-विदेश१३ लाख भारतीयांच्या क्रेडिट, डेबिट कार्डच्या माहितीची विक्री

१३ लाख भारतीयांच्या क्रेडिट, डेबिट कार्डच्या माहितीची विक्री

Subscribe

जोकर्स स्टॅश नावाच्या वेबसाईटवरुन भारतातील १३ लाख लोकांच्या क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती विक्रीला काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सध्या डिजिटल इंडियासाठी देशभरात कॅशलेस व्यवहार होत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जोकर्स स्टॅश नावाच्या वेबसाईटवर भारतातील १३ लाख क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती विक्रीला काढण्यात आल्याचा प्रकार सिंगापूरच्या तपास संस्थेने उघडकीस आणला आहे. या एका कार्डसाठी ७ हजार किंमत लावण्यात आली असून ही माहिती विकली गेल्यास भारतातील १३ लाख कार्डधारकांवर आर्थिक फसवणुकीचे संकट येणार आहे. दरम्यान, आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकार मानला जात आहे.

सिंगापूरची सुरक्षा संस्था ‘ग्रुप – आयबी’ने हा प्रकार जगासमोर आणला आहे. त्यानुसार त्यातील १८ टक्के कार्डची माहिती एकाच बँकेच्या कार्डची आहे. शिवाय इतर काही बँकांच्या कार्डची माहिती चोरी झाली असून एकूण कार्डपैकी ९८ टक्के कार्ड भारतीय बँकांचे आहेत. तर १ टक्का कार्ड कोलंबियातील असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

असा विकला जातो डेटा

कुख्यात असणाऱ्या जोकर्स स्टॅश नावाच्या वेबसाईटवर कार्डांची माहिती विकली जात आहे. त्यासाठी ‘इंडिया मिक्स न्यू ०१’ असे नाव देण्यात आले आहे. ट्रॅक १ आणि ट्रॅक २ अशा दोन प्रकारचा डेटा यावर विकला जात आहे. प्रत्येक कार्डसाठी १०० डॉलर किंमत आकारण्यात येत आहे. ही माहिती विकणाऱ्या सायबर गुन्हेगार यातून १३ लाख कोटी डॉलर्सची माया कमावणार आहे.

कार्ड धारकांना धोका

ज्या व्यक्तींच्या कार्डची माहिती डार्क वेबवर विकली जाईल आणि त्या कार्डचा वापर त्या हॅकरने केला तर त्या कार्डधारकांना आर्थिक भूर्दंड बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अशी चोरीला गेली माहिती

कार्डच्या माहितीची चोरी करण्यासाठी एटीएम सेंटरचा वापर करण्यात आला आहे. एटीएम सेंटरला हॅकर्स स्कीमर लावतात. ज्या ठिकाणी, असे स्कीमर लावले असतील, त्या एटीएममधून कार्डधारकाने पैसे काढल्यास त्या कार्डची सर्व माहिती चोरांकडे पोहोचते. शिवाय पीओएस हे मशिन कोणत्याही दुकानात किंवा हॉटेलमध्ये पाहायला मिळते. त्यालाही स्कीमर नावाचे उपकरण लावून माहिती चोरली जाते. ही माहिती देखील अशाच प्रकारे चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा – साडेपाच लाख प्रवाशांचा गतवर्षी लंडन प्रवास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -