घरदेश-विदेशसाडेपाच लाख प्रवाशांचा गतवर्षी लंडन प्रवास

साडेपाच लाख प्रवाशांचा गतवर्षी लंडन प्रवास

Subscribe

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठा प्रतिसाद

दिवाळ सणाच्या निमित्ताने लंडनला जाणार्‍या प्रवासी संख्येत २७ टक्के इतकी वाढ अपेक्षित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येथून लंडनसाठी विमानांच्या फेर्‍यांमध्ये आणखी वाढ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वर्जिन अटलांटिकच्या माध्यमातून नॉन स्टॉप अशा फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज ही फ्लाईट मुंबई ते लंडन दरम्यान असेल. गेल्या वर्षभराच्या कालावधीतही मुंबई ते लंडन दरम्यान प्रवासी वाढले आहेत.

वर्ष २०१८-१९ या कालावधीत मुंबई आणि लंडन दरम्यान ५.५० लाख इतक्या प्रवाशांनी वर्षभराच्या कालावधीत प्रवास केला. मुंबईसारख्या शहरासोबतच गोवा, अहमदाबाद, राजकोट यासारख्या शहरातूनही मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी लंडनचा प्रवास केला. सध्या मुंबई ते लंडन दरम्यान एकुण ३३ फ्लाईट्स आहेत. वर्जिन अटलांटिक एअऱलाईन्ससोबतच एअर इंडयानेही यंदा कुवेत आणि कोलंबो येथे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाईट्स सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षभरात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या माध्यमातून गरूडा इंडोनेशिया, जझिरा, एअर इटली, वँड एअर, एअर टांझानिया, स्टार एअर, उझबेकिस्तान एअरवेज यासारख्या फ्लाईट्स सुरू करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या १२ महिन्यात देशाअंतर्गत तसेच देशाबाहेरच्या अनेक फ्लाईट्स सुरू झाल्या आहेत. बाली, मिलान, तशकेंट, मँचेस्टर, फुकेट, गुआनझोऊ, माले, डार एस सालम यासारख्या ठिकाणांच्या त्यामध्ये समावेश आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामार्फत एअर मॉरिशिअस, सिंगापुर एअरलाईन्सची सुरूवात केली आहे. प्रिमिअम फर्स्ट क्लास सुट्सची सुविधाही या फ्लाईट्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -