घरक्राइमक्रूरतेची परिसीमा : ऑस्ट्रेलियात भारतीय तरुणीला जिवंत गाडले, माजी प्रियकराला जन्मठेप

क्रूरतेची परिसीमा : ऑस्ट्रेलियात भारतीय तरुणीला जिवंत गाडले, माजी प्रियकराला जन्मठेप

Subscribe

कॅनबेरा : श्रद्धा वालकर आणि सरस्वती वैद्य हत्याप्रकरणांनी सर्वचजण हादरले होते. पण अशी अमानुषता ऑस्ट्रेलियातही घडल्याचे उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या जस्मिन कौरला तिचा माजी प्रियकर तारिकजोत सिंगने जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. जस्मिनने त्याच्याशी तोडलेले संबंध पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याचा बदला घेण्यासाठी तारिकजोतने हे कृत्य केले. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

- Advertisement -

तारिकजोत सिंगने (23) 5 मार्च 2021 रोजी 21 वर्षीय जस्मिन कौरचे तिच्या अॅडलेड येथील कामाच्या ठिकाणाहून अपहरण केले. वायरने तिला बांधले आणि कारच्या डिकीमध्ये ठेवून चार तास फिरवले. नंतर तिच्या कामाच्या ठिकाणापासून 644 किमी दूर दक्षिण ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स रेंजमध्ये (पर्वतरांगा) नेले आणि तिथे तिला बेदम मारहाण करून जिवंत पुरले. आरोपी तारिकजोत सिंगने यावर्षी मार्च महिन्यात या हत्येची कबुली दिल्याचे जस्मिनच्या आईने सांगितले. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात तारिकजोतला शिक्षा ठोठावताना या भयंकर गुन्ह्याचे तपशील देण्यात आले. अत्यंत क्रूर पद्धतीने कौरची हत्या केली. शवविच्छेदन अहवालानुसार जस्मिनचा मृत्यू जमिनीत पुरल्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 6 मार्च 2021 रोजी झाल्याचे स्पष्ट झाले.

फिर्यादी पक्षाचे वकील कारमेन माटेओ यांनी सांगितले की, ही हत्या साधारण नव्हती आणि जस्मिनने खूप वेदना सहन कराव्या लागल्या असणार. तिला मातीत गाडताना माती तिच्या घशात जात असेल आणि त्यामुळे तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत असेल. यावरून तिला काय भोगावे लागले असेल याची कल्पना येते, असे माटेओ म्हणाले. शिक्षेसंबंधीचा युक्तिवाद ऐकण्यासाठी सुरू असताना जस्मिन कौरचे पालकही न्यायालयात उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार गटाचे दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीबाबत मोठे वक्तव्य, म्हणाले…

तारिकजोतने त्याआधी देखील जस्मिनला अनेक धमकीचे मेसेज पाठवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तारिकजोतने आधी हत्या केल्याचा इन्कार केला होता. जस्मिन कौरने आत्महत्या केली आणि आपण तिचा मृतदेह पुरला होता, असे त्यांनी सुरुवातीला सांगितले होते. पण या वर्षाच्या सुरुवातीला खटल्यापूर्वी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर तो पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी घेऊन गेला. तिथे त्यांना कौरचे बूट, चष्मा आणि कामाच्या नावाचा बॅच असलेला टाय करचराकुंडीत सापडला.

तारिकजोतने जस्मिनच्या हत्येची योजना आखली होती, त्यासाठी त्याने आपल्या रुमपार्टनर्सकडून पैसे घेतले होते. जस्मिनच्या हत्येच्या काही तास आधी, तो हातमोजे, वायर आणि फावडा खरेदी करताना तो सीसीटीव्हीत दिसला. या अमानवीय कृत्यासाठी तारिकजोतला आजन्म तुरुंगात राहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -