घरलाईफस्टाईलपावसाळ्यात फिरायला जातायं? तर 'ही' आहेत बेस्ट डेस्टिनेशन

पावसाळ्यात फिरायला जातायं? तर ‘ही’ आहेत बेस्ट डेस्टिनेशन

Subscribe

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच विकेंडला फिरायला जायचे प्लॅनिंग केले जातात. सर्वत्र हिरवेगार झाल्याने पावसाळ्याची मजा लुटता येते. अशातच तुम्ही पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर पुढील काही बेस्ट डेस्टिनेशनचा पर्याय तुम्ही निवडू शकता.

लोणावळा

- Advertisement -

पावसाळ्यात लोणावळ्याला फिरायला जायचा आनंद वेगळाच असतो. लोणावळ्यात अनेक धबधबे आणि पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुम्ही ग्रुपने सुद्धा ट्रॅव्हल करू शकता. याची अनोखी मजा पावसाळ्यात लुटता येईल.

गोवा

- Advertisement -

गोवामध्ये जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार झाल्याने तेथे जाण्याची मजा वेगळी असते. पावसाळ्यात गोव्याचा प्लॅनिंग करत असाल तर शॅक हे बंद केले जातात. परंतु तेथील रोड सफारी तुम्ही नक्की करू शकता.

कोडाईकनाल

कोडाईकनाल हा दक्षिण भारतातील तामिळनाडूतील एक डोंगराळ भाग आहे. कोडाईकनालला तुम्ही जुलै महिन्यात तुम्ही नक्की भेट देऊ शकता. येथील निसर्ग पाहण्याजोगा असतो.

अलेप्पी

केरळमध्ये अलेप्पी हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी जुलै महिन्यात जोरदार पाऊस असतो. पावसाळ्यात हे ठिकाण कपल्ससाठी आवडते डेस्टिनेशन आहे.

 

कुर्ग

कुर्ग हे कर्नाटकातील एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणी पावसाळ्यात अनेक जण फिरायला जातात. हे एक शांत हिल स्टेशन असले तरीही तेथे गेल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते.

गंगटोक

गंगटोक हे सिक्किमची राजधानी असून तुम्ही येथे भेट देऊ शकता. गंगटोल येथे जुलै महिन्यात खूप सुंदर दिसते.


हेही वाचा – बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीजचे ‘हे’ आहे फेवरेट डेस्टीनेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -