घरदेश-विदेशअखेर दलाई लामांनी ६४ वर्षांनी स्वीकारला मॅगसेसे पुरस्कार; नेमके काय आहे कारण?

अखेर दलाई लामांनी ६४ वर्षांनी स्वीकारला मॅगसेसे पुरस्कार; नेमके काय आहे कारण?

Subscribe

नवी दिल्लीः तिबेट धर्मगुरु दलाई लामा यांनी तब्बल ६४ वर्षांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्विकारला. फिलिपिन्स सरकारने १९५९ साली या पुरस्काराची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी दलाई लामा यांचा चीनसोबत संघर्ष सुरु होता. त्यामुळे ते पुरस्कार घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. अखेर फिलिपिन्स सरकारने बुधवारी हिमाचलमध्ये येऊन दलाई लामा यांना हा पुरस्कार दिला.

हा पुरस्कार आशियातील नोबेल पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराला प्रतिष्ठा आहे. तिबेटी नागरिकांसाठी दलाई लामा यांनी संघर्ष केला. तिबेट संस्कृतीला प्रेरणा दिली. तिबेटमधील बौध्द धर्मीयांसाठी ते झटले. या कामागिरीसाठी दलाई लामा यांना हा पुरस्कार जाहिर झाला होता. त्यावेळी दलाई लामा चीन सरकारसोबत लढा देत होते. चीन सरकार त्यांना अटकही करणार होती. पंडित जवाहलाल नेहरु यांनी दलाई लामा यांना भारतात संरक्षण दिले. परिणामी ते पुरस्कार घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. दलाई लामा हे सध्या हिमाचल येथे धर्मशाळेत आहेत. फिलिपिन्स सरकारने तेथे येऊन दलाई लामा यांना हा पुरस्कार दिला.

- Advertisement -

गेली अनेक वर्षे दलाई लामा भारतात वास्तव्य करत आहेत. मात्र चीनने यावर अनेकदा आक्षेप घेतला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दलाई लामा यांना ८६ व्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले होते. तसेच दलाई लामा यांच्याशी प्रत्यक्षात बोलणे झाल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. ६ जुलै रोजी तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केला जातो. जो चीनला अजिबात मान्य नाही. याच्या निषेधार्थ देमचुकम येथील सिंधू नदीजवळ चीनच्या वाहनांनी घुसघोरी करत भारतविरोधी बॅनर आणि चिनी झेंडे फडकवण्यास सुरुवात केली. चिनी सैनिक ज्या ठिकाणी उभे होते आणि निदर्शने करीत होते ती जागा म्हणजे भारताची भूमी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -