घरताज्या घडामोडीरस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीला ७० कोटींचा खड्डा

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीला ७० कोटींचा खड्डा

Subscribe

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महापालिका ४०० किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांसाठी सहा हजार कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महापालिका ४०० किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांसाठी सहा हजार कोटी रुपये खर्चणार आहे. तसेच, मुंबई महापालिका पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी व पुनरपृष्ठीकरण कामांसाठी यंदा ७० कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. (70 crore hole in the coffers of the municipality to fill the potholes on the roads)

मुंबई महापालिका दरवर्षी रस्ते कामांसाठी किमान तीन – साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करते. तर दरवर्षी पावसाळयात रस्त्यावर लहान – मोठे खड्डे पडत असतात. रस्त्याची कामे निकृष्ट झाल्यास अथवा केबल लाईन टाकण्यासाठी खोदलेले चर नीटपणे न बुजविल्यास रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिका दरवर्षी काही कोटींची रक्कम खर्च करते. त्याचा आर्थिक फटका पालिकेच्या तिजोरीला बसत असतो. त्याचप्रमाणे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांनी व वाहन चालकांनाही त्याचा त्रास होतो. मात्र रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविणारे कंत्राटदार अलगदपणे सुटतात.

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिकेतील सत्तेवर व त्यासाठी जिंकाव्या लागणाऱ्या पालिका निवडणुकीवर आहे. त्याच दृष्टिकोनामधून मुख्यमंत्री शिंदे यांनी, पालिका आयुक्त इकबाल चहल यांना यंदा एकदम ४०० किमी लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे आदेश दिले. त्यासाठी पालिकेला अंदाजे सहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

रस्ते चांगले ठेवण्यासाठी पावसाळ्यात सदर रस्त्यांवर पडणारे खड्डे तात्काळ बुजविणे आवश्यक असते. त्यासाठी पालिका, शहर भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी २० कोटी रुपये, पूर्व उपनगरे येथील खड्डे बुजविण्यासाठी २० कोटी रुपये तर पश्चिम उपनगरे येघील खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार यंदाचा नौसेना दिन, राष्ट्रपती, पंतप्रधान उपस्थित राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -