घरदेश-विदेशकिळसवाणं आंदोलन; पोलिसांच्या तोंडावर फेकली मानवी विष्ठा

किळसवाणं आंदोलन; पोलिसांच्या तोंडावर फेकली मानवी विष्ठा

Subscribe

फ्रान्समध्ये 'येलो वेस्ट' या आंदोलनाने किळसवाणं रुप धारण केलं आहे. आंदोलक पोलिसांच्या तोंडावर मानवी विष्ठाने भरलेल्या पिशव्या फेकत आहेत.

इंधनाच्या दरवाढी विरोधात फ्रान्समध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरामध्ये चढ-उतार होत आहेत. परंतु, फ्रान्समध्ये इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चाचले आहेत. त्यामुळे संतप्त झालेली जनता गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर उतरली आहे. जनतेने फ्रान्स सरकारच्या विरोधात सुरु केलेल्या या आंदोलनाचे नाव ‘येलो वेस्ट’ असे आहे. सध्या या आंदोलनाने किळसवाणे रुप धारण केले आहे. आंदोलक आता पोलिसांच्या तोंडावर मानवी विष्ठा फेकत आहेत. त्यामुळे आंदोलकांना आवरणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे.

११ जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे.  शनिवारी फ्रान्स पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षात ११ आंदोलकांचा मृत्यू झाला. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून हे आंदोलन सुरु आहे. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात मोठा जनक्षोभ उफाळला होता. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. या हल्ल्यात पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षात १०० आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर २८८ जणांना अटक करण्यात आले होते. तेव्हापासून हे आंदोलन सुरुच आहे. या रौद्र आंदोलनाने आता किळसवाणे रुप धारण केले आहे. आंदोलक आता मानवी विष्ठा भरलेल्या पिशव्या पोलिसांच्या तोंडावर फेकत आहेत. त्यामुळे या आंदोलकांना आवरणे पोलिसांनाही कठीण होऊन बसले आहे. पोलीस या पिशव्यांपासून लांब होत आहेत. ‘येलो वेस्ट’च्या या किळसवाणे आंदोलनावर जगभरात टीका होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -