घरमुंबईहिरेव्यापारी उदानी हत्याप्रकरण: आरोपींविरोधात १३३० पानी आरोपपत्र सादर

हिरेव्यापारी उदानी हत्याप्रकरण: आरोपींविरोधात १३३० पानी आरोपपत्र सादर

Subscribe

घाटकोपर येथील सोने-चांदीचे सराफा व्यापारी राजेश्वर उदानी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. ४ डिसेंबर रोजी पनवेलच्या जंगलात त्यांचा मृतदेह सापडला होता.

घाटकोपरचे हिरे व्यापारी राजेश्वरी उदानी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. घाटोकपरच्या पंतनगर पोलिसांनी आज विक्रोळी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर १३३० पानी आरोपपत्र सादर केले. या हत्याप्रकरणात एकूण ७ आरोपी असून सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे. उदानी यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सचिन पवार याच्या गर्लफ्रेंडवर उदानी यांची वाईट नजर होती. याकारणासह ५० हजार रुपयांसाठी उदानी यांची हत्या केली असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात सांगितले आहे. या आरोपपत्रासाठी पोलिसांनी एकूण २०४ साक्षिदारांचा जबाब नोंदवला होता. तसंच उदानी यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी वापरलेला मोबाईल आणि गाडी हे मुख्य पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दिलेल्या मुदतीआधीच आरोपपत्र सादर

घाटकोपर येथील सोने-चांदीचे सराफा व्यापारी राजेश्वर उदानी (५७) २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. ४ डिसेंबर रोजी पनवेलच्या जंगलात त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पंतनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पंतनगर पोलिसांना त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या हत्येचा तपासाला सुरुवात करत आधी सचिन पवारसह ५ जणांना अटक केली. त्यानंतर उर्वरित दोन जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना ९० दिवसांचा अवधी दिला होता. हा अवधी ८ मार्च रोजी संपणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी आरोपींविरोधात १३३० पानांचे आरोपपत्र सादर केले.

- Advertisement -

हेही वाचा – उदानींना ब्लॅकमेल करण्यासाठी सचिनने लावला होता हनीट्रॅप


उदानी हत्या प्रकरणातील सात आरोपी

उदानी हत्या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. प्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांचा पीए सचिन पवार, निलंबित पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार, महेश भोईर, प्रविण, सिद्धेश पाटील, साहिस्ता खान आणि निशात खान या आरोपींना पोलिसांनी एका महिन्यात अटक केली होती. आधी पाच आरोपींना अटक केली होती त्यानंतर इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींवर उदानी यांचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – लव्ह ,सेक्स ,पैसे आणि धोका


५० हजारांसाठी हत्या

पोलिसांनी सादर केलेल्या १३३० पानांच्या आरोपपत्रामध्ये २१४ साक्षिदारांचे जबाब, ऑटोप्सी रिपोर्ट, डीएनए रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवाल जोडण्यात आले आहे. तसेच हिरे व्यापारी उदानी आणि आरोपी सचिन पवार यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवरील मॅसेजेस आरोपत्रात जोडण्यात आले आहे. हत्या ५० हजार रुपयांसाठी केली असल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. त्यानुसार उदानी यांनी मुलीच्या लग्नात इव्हेंट मॅनेजमेंटचे काम सचिनला दिले होते. त्यावेळी सचिनने उदानी यांच्याकडून ५० हजार रुपये जास्त घेतले होते. ही गोष्ट उदानी यांना कळाल्यानंतर त्यांनी सचिनकडे पैशाची सतत मागणी केली. त्यानंतर काही दिवसातच उदानी यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -