घरदेश-विदेशअफवा ठरल्या फोल, जम्मू-काश्मिरात शांततेत ईद साजरी!

अफवा ठरल्या फोल, जम्मू-काश्मिरात शांततेत ईद साजरी!

Subscribe

कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ही शंका फोल ठरली असून अत्यंत शांततेत ईद साजरी झाली आहे.

संसदेत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण होतं. या वातावरणातच ईद आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि लष्करावर देखील ताण होता. राज्यात हिंसाचार किंवा दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, जम्मू-काश्मीरमधल्या जनतेने या सगळ्या अफवा, शक्यता, तर्क खोटे ठरवले असून अगदी शांततेत सोमवारी ईदचा सण साजरा करण्यात आला. ‘यासंदर्भात पसरवण्यात आलेल्या कोणत्याही अफवांवर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, एकही गोळीबाराची घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडलेली नाही’, असं आवाहन जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी केलं आहे.

- Advertisement -

२० हजार विद्यार्थ्यांनी साजरी केली ईद

कलम ३७० हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील वातावरण ईदच्या दिवशी अधिक बिघडेल, हिंसाचार होऊ शकतो किंवा दहशतवादी हल्ला देखील होण्याची शक्यता आहे असे इशारे दिले जात होते. प्रत्यक्षात मात्र, इथे शांततेत ईद साजरी झाली. खुद्द राज्याचे सचिव रोहित कंसल यांनीच ही माहिती दिली. ‘ईदच्या दिवशी राज्यातलं वातावरण खराब होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली गेली होती. सर्व ठिकाणच्या आरोग्य सुविधा देखील कार्यरत होत्या. मात्र, हिंसाचाराची एकही घटना इथे घडली नाही. जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी देखील शाळांमध्ये शांततेत ईद साजरी केली’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

गोळीबाराचं वृत्त खोटं

दरम्यान, काश्मीरच्या खोऱ्यात गोळीबार झाल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र हे वृत्त खोटं असल्याचं कंसल यांनी ठामपणे सांगितलं. ‘काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अगदी किरकोळ घटना घडल्या. मात्र, त्याव्यतिरिक्त पूर्ण राज्यातली परिस्थिती नियंत्रणात असून सगळीकडे उत्साहात ईद साजरी झाली’, अशी माहिती राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक एस. पी. पानी यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -