घरदेश-विदेशElection Commission : ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू नवे निवडणूक आयुक्त

Election Commission : ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू नवे निवडणूक आयुक्त

Subscribe

नवी दिल्ली : दोन माजी सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज (ता. 14 मार्च) निवड केली. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीचे आयुक्तपद रिकामे होते. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना आयुक्तांनीच राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पंतप्रधानांच्या समितीने दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची आयोगावर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली आहे. (Election Commission: Dyanesh Kumar and Sukhbir Singh Sandhu are the new Election Commissioners)

हेही वाचा… Supreme Court : सुप्रीम कोर्ट घड्याळ बंद पाडणार? अजित पवारांना नवे चिन्ह निवडण्याची सूचना

- Advertisement -

काँग्रेसचे नेते, खासदार अधीर रंजन चौधरी यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. अधीर रंजन चौधरी हे पंतप्रधानांच्या समितीमधील एकमेव विरोधी पक्षातील नेते आहेत. चौधरी यांनी माध्यमांशी बोलत असताना याची माहिती दिली. चौधरी म्हणाले की, समितीसमोर उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदभर पांडे, सुखबीर संधू, सुधीर कुमार आणि गंगाधर रहाटे यांची नावे होती. त्यातून आम्ही ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी यांनी समितीच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीच्या आधी अधिकाऱ्यांची यादी आपल्याला उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले होते. मात्र बुधवारी आपल्याला 212 अधिकाऱ्यांची यादी मिळाली, असा दावा चौधरी यांनी केला आहे. दुसरीकडे सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार, चौधरी यांना पाच याद्या पाठविण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 236 नावे होती.

- Advertisement -

संपूर्ण यादीमध्ये भारत सरकारच्या 92 निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता. ज्यांनी सचिव किंवा तत्सम पदावर काम केलेले आहे. त्याशिवाय सध्या सरकारी सेवेत असलेल्या 93 सचिव किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे होती. मागच्या एका वर्षात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून मुख्य सचिव या पदावरून निवृत्त झालेल्या 15 अधिकाऱ्यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -