घरदेश-विदेशमतदार ओळखपत्र आधारला जोडावे; निवडणूक आयोगाचे मोदी सरकारला पत्र

मतदार ओळखपत्र आधारला जोडावे; निवडणूक आयोगाचे मोदी सरकारला पत्र

Subscribe

मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने मोद सरकारकडे केली आहे. यासाठी आयोगाने कायदे मंत्रालयाला पत्रदेखील लिहिले आहे.

मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने मोद सरकारकडे केली आहे. यासाठी आयोगाने कायदे मंत्रालयाला पत्रदेखील लिहिले आहे. मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. हे पाऊल उचलले गेल्यास बोगस मतदार ओळखपत्रांना चाप बसेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पॅन कार्डनंतर मतदार ओळखपत्रदेखील आधार कार्डला जोडले जाऊ शकते. तसेच लोकप्रतिनिधी कायदा १९५० मध्ये सुधारणा करण्याची शिफारसही आयोगाने केली आहे.

‘एक व्यक्ती एक मत’ योग्य प्रकारे राबवायचे असेल तर निवडणूक ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक करावे, अशी निवडणून आयोगाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आधी आयोगाने आधार आणि निवडणूक ओळखपत्र लिंक असणे वैकल्पिक असल्याचे म्हटले होते. मात्र माजी निवडणूक आयुक्त ए. के. जोटी यांनी २०१६ मध्ये आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निवडणूक पॅनेलने त्यांची भूमिका बदलली. आतापर्यंत ३२ कोटी आधार क्रमांक निवडणूक ओळखपत्राशी लिंक झाले आहेत.

- Advertisement -

मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची मागणी निवडणूक आयोगाने याआधीही सरकारकडे केली होती. मात्र त्यावेळी आधार प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होते. त्यामुळे सरकारनं मतदार ओळखपत्र आणि आधारच्या जोडणीचा विषय टाळला. मात्र आता निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा याबद्दलची मागणी केली आहे. मोदी सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या निर्णयांचा धडाका लावल्याने या मागणीचा सकारात्मक विचार होईल, अशी आशा निवडणूक आयोगाला वाटते.

हेही वाचा –

राष्ट्रवादीचे नेते धनराज महालेंची घरवापसी; आज शिवसेनेत प्रवेश करणार

- Advertisement -

Video: विनयभंग झाला नाही, ‘त्या’ महिलेची महाडेश्वरांना ‘क्लिन चिट’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -