घरमुंबई१५ ऑगस्ट दिनी 'त्यांना' मिळाले अंधारातून स्वातंत्र्य

१५ ऑगस्ट दिनी ‘त्यांना’ मिळाले अंधारातून स्वातंत्र्य

Subscribe

लक्ष्मी आय इन्स्टिटयूटचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी ७२ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. ठाण्यातील मुरबाड, शहापूर, बदलापूर, कर्जत तसंच रायगडमधील पनवेल, उरण, माणगाव आणि तळा या तालुक्यातून शंभरहुन अधिक नागरिक या मिशन दृष्टीमध्ये सहभागी झाले होते.

मुंबईसह उपनगरांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिटयूट आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टकडून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ७२ नागरिकांना दृष्टी देण्यात यश आलं आहे. या रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन स्वातंत्रदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. लक्ष्मी आय इन्स्टिटयूटचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी ७२ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. ठाण्यातील मुरबाड, शहापूर, बदलापूर, कर्जत तसंच रायगडमधील पनवेल, उरण, माणगाव आणि तळा या तालुक्यातून शंभरहुन अधिक नागरिक या मिशन दृष्टीमध्ये सहभागी झाले होते.

३८ लाख भारतीयांना मोतीबिंदूचा त्रास

‘मिशन दृष्टी’ विषयी अधिक माहिती देताना लक्ष्मी आय इंस्टीट्युटचे संचालक आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी सांगितलं, ‘जागतिक आरोग्य संघटना आणि अंधत्व नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये दृष्टी गमावलेले १ करोड २० लाख अंध नागरीक आहेत. यापैकी ८० टक्के नागरिकांना मोतीबिंदूमुळे अंधत्व आले आहे. आजही दरवर्षी ३८ लाख भारतीय नागरिक मोतीबिंदूच्या आजारामुळे पर्शियल( एका डोळ्याने) अथवा दोन्ही डोळ्याने अंध होत आहेत. वयाच्या चाळीशीमध्ये दृष्टी कमी होणे, दिवसातील ८ ते १० तास कृत्रिम उजेडात काम करणे, मोबाईलचा अती वापर यामुळे डोळ्याच्या अनेक समस्या भारतातील नागरिकांना भेडसावत आहेत.’.

- Advertisement -

‘दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये नागरिकांना उपक्रमात सहभागी करणार’ 

‘धकाधकीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि आहारामध्ये जंक फूडचा अतिरेक यामुळे शरीरातील प्रथिनांचे लवकर विघटीकरण होऊन मोतीबिंदूचा आजार वाढीस लागतो. त्यामुळे, ‘मिशन दृष्टी’ हा उपक्रम असाच सुरु राहणार असून आम्ही दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये मोतीबिंदू असलेल्या नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेणार आहोत’, असे डॉ. हळदीपूरकर म्हणाले. अकाली येणाऱ्या अंधत्त्वावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन मोतीबिंदू निवारण योजना राबवत असून त्याच्यासोबत आमची संस्था ही पुढाकार घेत असल्याचं डॉ. हळदीपूरकर यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – आधारकार्ड दाखवा, मोतीबींदूचं ऑपरेशन मोफत करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -