घरदेश-विदेशपुलवामामध्ये चकमक: दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये चकमक: दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

अवंतीपुरी भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्य आधारावर त्यांनी त्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. पुलवामाच्या अवंतीपुरी भागामध्ये चकमक झाली असून ही चकमक अजूनही सुरुच आहे. जवानांना अवंतीपुरी भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्य आधारावर त्यांनी त्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दरम्यान, झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरुन जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केले आहेत.

- Advertisement -

काल दोन दहशतवाद्यांचा खात्मा

याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. पत्रकार शुजान बुखारी हत्याकांडाचा मास्टरमाइंड आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कैदेतून फरार झालेला दहशतवादी नावेद जट याला त्याच्या साथिदारासोबत ठार करण्यात आले. बडगाम जिल्ह्यातल्या छत्रगामच्या कुठपोरा गावामध्ये ही चकमक झाली. दरम्यान स्थानिकांनी जवानांवर दगडफेक केली त्यामधून एक दहशतवादी पळून गेला.

९ महिन्यापूर्वी नवीदला पळवून नेले होते

पत्रकार शुजात बुखारी आणि त्यांच्या सुरक्षालक्षकांवर नवीद जट या दहशतवाद्याने हल्ला केला. ९ महिन्यापूर्वी दहशतवादी नवीद पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आणण्यात आले होते. त्यावेळ दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करत नवीदला पळवून नेले होते. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस शहीद झाले होते. तर चार जवान जखमी झाले होते. तावडीतून सुटका करुन घेऊन गेले होते.

- Advertisement -

नवीदवर १२ लाखांचे होते बक्षीस

नवीद जवानांच्या हिटलिस्टमधील टॉप १० मधील दहशतवादी होता. नवीदची माहिती सांगणाऱ्याला१२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नवीद जट पाकिस्तानचा राहाणारा होता. २०१२ मध्ये तो २२ दहशतवाद्यांसोबत सीमा पार करुन कुपवाडामध्ये आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -