घरदेश-विदेशगौतम अदानी ठरले सर्वाधिक कमाई करणारे उद्योजक

गौतम अदानी ठरले सर्वाधिक कमाई करणारे उद्योजक

Subscribe

टेस्लाच्या इलॉन मस्क आणि ॲमेझॉनच्या जेफ बेजोस यांनाही मागे टाकले

२०२० हे वर्ष कोरोनामुळे मंदीच्या सावटाखाली गेले. याचा सर्वाधिक फटका देशातील उद्योगधंदे, व्यापार आणि आर्थिक क्षेत्राला बसला. यादरम्यान मात्र भारतीय प्रसिद्ध उद्योगपतींच्या संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली. कोरोना संकटाचा भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनाही फायदा झाला आहे. कारण २०२० या वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. एकाच वर्षात संपत्तीत सर्वाधिक वाढ झाल्याने अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी यांच्या नावाचा समावेश झाला आहे. गौतम अदानी यांच्या वाढत्या संपत्तीमुळे त्यांनी टेस्लाच्या इलॉन मस्क आणि ॲमेझॉनच्या जेफ बेजोस यांनाही मागे टाकले आहे.

Bloomberg Billionaires Index च्या आकडेवारीनुसार, अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये १६.२ अब्ज डॉलर्सवरुन ५० अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. वीजनिर्मिती क्षेत्रात भरारी घेणारा अदानी समूह जळपास सर्व उद्योग क्षेत्रात विस्तार करत आहे. तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत ८१० कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. मात्र अंबानींच्या संपत्तीशीबरोबरी गौतम अदानी करु शकले नाहीत. मुकेश अंबानी जागतिक अब्जाधिशांच्या यादीत दहाव्या स्थानी आहेत तर गौतम अदानी हे 26 व्या स्थानी आहेत. अदानी उद्योग कंपनीच्या शेअर्समध्येही ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या अदानी गॅसचे शेअर्स ९६ टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स ७९ टक्क्यांनी, अदानी पोर्टचा शेअर्स ५२ टक्क्यांनी व अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स १२ टक्क्यांवर पोहचले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा- माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -