घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युक्रेनमधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या नवीनचे पार्थिव पाहून वडिलांनी घेतला...

Russia Ukraine War: युक्रेनमधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या नवीनचे पार्थिव पाहून वडिलांनी घेतला ‘हा’ निर्णय, भावूक झाले लोक

Subscribe

रशिया आणि युक्रेन हल्ल्याचा आज २६वा दिवस आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पाचे पार्थिव शरीर बऱ्याच दिवसांनंतर अखेर आज भारतात पोहोचले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीनला श्रद्धांजली वाहून त्याच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली. आपल्या मुलाचे पार्थिव शरीर आणल्यामुळे नवीनच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि एक मोठा निर्णय घेतला.

- Advertisement -

मुलाचे पार्थिव शरीर केले दान

मुलाला गमावण्याचे दुःख मनात ठेवून नवीनचे वडील म्हणाले की, ‘धार्मिक विधीनंतर एका जवळच्या खासगी मेडिकल कॉलेजमध्ये नवीनचे पार्थिव शरीर दान केले जाईल.’

१ मार्चला खारकिवमध्ये रशियाने केलेल्या गोळीबारादरम्यान नवीनचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांचे कुटुंबिय त्याचे पार्थिव देशात आणण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करत होते. नवीनचा छोटा भाऊ हर्ष शेखरप्पाने भावाचे पार्थिव शरीर कर्नाटकात आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच विमानतळावर असलेले त्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनाही मुख्यमंत्री बोम्मईचे आभार व्यक्त केले.

- Advertisement -

किवच्या मेडिकल कॉलेजमध्ये होते नवीनचे पार्थिव शरीर

कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्त नोडल अधिकारी मनोज राजन म्हणाले की, कर्नाटकच्या ५७२ विद्यार्थ्यांना युक्रेनहून परत आणले आहे. नवीनचे पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. मग किवहून पोलंडला त्यांचे पार्थिव शरीर आणले गेले आणि दुबईमार्गे बंगळुरू विमानतळावर आणले. मग नवीनच्या कुटुंबियांना त्याचे पार्थिव शरीर दिले. सरकारने हावेरी जिल्ह्यातील त्याच्या गावापर्यंत पार्थिव पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती.

माहितीनुसार, नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. खारकिव शहरातल्या बंकरमध्ये नवीनने आश्रय घेतला होता. पण जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तो बंकरमधून बाहेर पडला आणि त्याचदरम्यान रशियाने केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.


हेही वाचा – Russia Ukraine War: चर्चा झाली नाही तर तिसरे महायुद्ध अटळ, झेलेन्स्कींचा रशियाला इशारा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -