घरक्रीडाआजपासून फिफाच्या महायुद्धाला सुरूवात

आजपासून फिफाच्या महायुद्धाला सुरूवात

Subscribe

आजपासून फिफाच्या २१व्या विश्वचषकाला सुरूवात होत आहे. रशियात रंगणाऱ्या यावर्षीच्या वर्ल्डकपचा फिवर रशियासोबतच जगभरात दिसून येतो आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमी रशियात आपआपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले आहेत. निळ्या-पांढऱ्या रंगाच्या पट्यांची जर्सी घातलेले आणि पाठीवर मेस्सी लिहिलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी तर रशियाच्या रस्त्यांवर गर्दी केली आहे. ३२ संघात होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील आघाडीचे फुटबॉलपटू एकमेंकाविरुद्ध खेळणार आहेत.

रशिया आणि सौदी अरेबियात रंगणार पहिली लढत

विश्वचषकाचा पहिला सामना यजमान संघ असणाऱ्या रशियाविरूद्ध सौदी अरेबिया यांच्यात होणार आहे. जागतिक क्रमवारीत चांगले स्थान नसले तरी यजमान देश असल्यामुळे रशियाला या स्पर्धेत खेळण्याचा मान मिळणार आहे. रशियाचा गोलकिपर इगोर अकिनफीव संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर जागतिक क्रमवारीत ६७व्या क्रमांकावर असणाऱ्या सौदी अरेबियाचा ओसामा हवसावी हा कर्णधार असणार आहे. स्पर्धेतील ३२ संघात सर्वात पिछाडीवर असलेल्या या दोन्ही संघाना ‘अ’ गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी ही लढत जिंकणे अनिवार्य आहे.

- Advertisement -
Russia vs Saudi Arabia
रशियाविरूद्ध सौदी अरेबिया

फिफाचा उदघाटन सोहळा

भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी संध्याकाळी ६.३० वाजता उदघाटन सोहळ्याला सुरूवात होईल. सुमारे ८० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने ५०० कलाकार आपली कला सादर करतील. स्पर्धेचे या वर्षीचे थीम साँग असलेल्या ‘लाईव्ह इट अप’ या गाण्याचे सादरीकरण हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ आणि गायक निकी जॅम करणार आहेत. तसेच ब्रिटिश गायक, लेखक आणि अभिनेता रॉबी विल्यम्स, रशियन गायिका गुरिफिलिना, ओपेरा गायक प्लॅसिडो डोमिंगो आणि गायक दियोगो फ्लोरेज हे आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोदेखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार आहे.

सहभागी देशांकडून पोलीस तैनात

स्पर्धेच्या आयोजकांनी सुरक्षेची हमी दिली असली तरी रशियासारख्या खंडप्राय देशात एवढ्या मोठ्या स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धेत लाखो लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर देशांनीही आपली पोलीस यंत्रणा रशियाला पुरविली आहे.११ शहरांत खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी ३२ देश आपली सुरक्षा यंत्रणा रशियाला पुरविणार आहेत. रशिया आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांचे संबंध चांगले नसले तरी राजकारण आणि खेळ या दोन भिन्न गोष्टी असल्याचे एका ब्रिटिश सुरक्षारक्षकाने म्हटले आहे. इस्लामिक स्टेट्ससारख्या संघटना आणि रशियातील काही दहशतवादी गट यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुरक्षा यंत्रणांवर आहे.

- Advertisement -

वर्ल्डकपसाठी गुगलनेही दिली मानवंदना

आज रशियात फिफा वर्ल्डकप २०१८ सुरू होणार आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमींची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली असताना जगातील नंबर १ क्रमांकाचे सर्च इंजिन असणाऱ्या गुगलनेही एक खास डुडल तयार केले आहे.

fifa doodle
गुगलचे आज साठीचे खास डुडल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -