घरदेश-विदेशदेशातील १० बँकांचे विलीनीकरण; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

देशातील १० बँकांचे विलीनीकरण; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

Subscribe

देशावर आलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमम यांनी बँकिंग क्षेत्रासंबंधी मोठी घोषणा केली आहे. देशातील १० राष्ट्रियीकृत बँकांचे विलीनीकरण करणार असल्याची घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांनी केली. विलीनीकरण करण्यात येणाऱ्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक यांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केली. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही असेही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. तर कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असणार आहे.

- Advertisement -

या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर त्यांनी एनपीएचेही उदाहरण दिले. एनपीए अर्थात थकीत कर्जांचे प्रमाण घटले आहे. थकीत कर्जांचे अर्थात एनपीएचे प्रमाण हे ८.६५ लाख कोटींवरुन कमी होत ७.९० लाख कोटींवर आले आहे, असेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -