घरदेश-विदेशकराचीत मृत्यूचा हाहा:कार, तेजगाम एक्स्प्रेसमध्ये ६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

कराचीत मृत्यूचा हाहा:कार, तेजगाम एक्स्प्रेसमध्ये ६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Subscribe

पाकिस्तानमध्ये गुरवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या अग्नितांडवामध्ये सुमारे ६२ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३०हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसमध्ये सकाळी एक स्फोट झाला आणि त्यामुळे एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीमध्ये कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसचे ३ डबे जळून खाक झाले आहेत. अजूनही जखमींवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडच्या रहीम यार खान या ठिकाणी एक्स्प्रेसमध्ये हा आगीचा भडका उडाला. आग लागल्यानंतर अनेक प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या टाकल्या. त्यामुळे देखील जखमी आणि मृतांचा आकडा वाढल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

रेल्वेमध्ये असलेल्या किचनमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे डब्यांनी पेट घेतला आणि त्यात प्रवाशांचा बळी गेला अशी माहिती पाकिस्तानचे रल्वेमंत्री रशीद खान यांनी दिली आहे.

- Advertisement -

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हार होऊ लागला आहे. यामध्ये तीन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसत आहे. आग लागलेल्या तीन डब्यांमध्ये सुमारे २०० हून अधिक प्रवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -