घरदेश-विदेशपाकमधून ५ महिन्याच्या बाळाची तस्करी; बॅगेतून बाळ पोहोचला थेट दुबईत

पाकमधून ५ महिन्याच्या बाळाची तस्करी; बॅगेतून बाळ पोहोचला थेट दुबईत

Subscribe

कि़डनॅप करणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हा गोंडस चिमुरडा त्याच्या आई-वडिलांजवळ सुखरूप आहे

दुबई एअरपोर्टवर चेकींग दरम्यान ट्रॅव्हल बॅगेत ५ महिन्याचा गोंडस चिमुरडा सापडला. या बाळाला पाकिस्तामधून किडनॅप करण्यात आले होते. या बाळाचे किडनॅप करून त्याला दुबईला जाण्याकरिता कराची येथून नेण्यात आले. यावेळी पाकिस्तानमधील मुलाचे अपहरण करून दुबईला कराची येथून बॅगमध्ये तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

बाळाला ट्रॅव्हल बॅगेतून किडनॅप करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ दक्षिण दिल्लीच्या डीसीपी एचजीएस धालीवाल यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

- Advertisement -

या शेअर केलेल्या व्हिडिओ बघितला असता असे लक्षात येते की, या बाळाला किडनॅप करून नेण्यासाठी एका साधारण ट्रॅव्हल बॅगेचा वापर करण्यात आला होता. यावेळी बाळाला बॅगेतून नेताना त्या बाळाला बॅगेत भरून त्याच्यावर काही वस्तू देखील ठेवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

कि़डनॅप करणाऱ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर हा गोंडस चिमुरडा सुखरूप असून त्याच्या आई-वडिलांजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे.


गेल्या काही दिवसांपुर्वी गुजरातमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने अमेरिकेला जाण्यासाठी असाच भन्नाट प्लॅन केला होता. मात्र एअर पोर्टवर असलेल्या कडेकोट सुरक्षेमुळे या ३० ते ३२ वर्षीय तरूणाचे भांडे फुटले. हा तरुण अहमदाबाद येथे राहणारा होता. त्याला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने तरूणपणातच ८१ वर्षीय वयोवृद्ध वाटेल असे वेशांतर केले होते.. ही बातमी अधिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

स्वप्न पुर्ण करण्यासाठी तीस वर्षीय तरूण झाला ८१ वर्षाचा वृद्ध

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -