घरमहाराष्ट्रनाशिकफाईल गहाळ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या आमदारांचा जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या

फाईल गहाळ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या आमदारांचा जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या

Subscribe

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने महत्वाच्या कामाच्या फाईल गहाळ केल्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी काल, मंगळवारी रात्रभर जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. दिंडोरी तालुक्यातील चौसाळे आणि सावरपातळी येथे सिमेंट काँक्रीट बंधारे बांधणे या निविदा प्रक्रियेत कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) यांनी त्यांच्या अधिकारात अनियमितता केल्याने तसेच त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या नस्ती विभागातून गहाळ झाल्याचे सांगणे या सर्व प्रकरणाचा खुलासा अजून पावेतो न होणे आणि संबंधितांवर कार्यवाही न झाल्यामुळे जो पर्यंत या सर्व प्रकरणाचा खुलासा होऊन कार्यवाही होत नाही तोपर्यंत मंगळवार, १७ सप्टेंबर २०१९ सकाळी ११.३० वाजेपासून आमदार नरहरी झिरवाळ यांनी नाशिकच्या जिल्हा परिषद ठिय्या आंदोलन केले आहे. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांना देखील पत्र लिहिले आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, रात्री उशिरा संबंधित अधिकारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी आमदार झिरवळ यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरल्याची माहिती मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -