घरदेश-विदेशDemonetisation: नोटाबंदीला पाच वर्षे पूर्ण, रोख आणि डिजिटल व्यवहारांमध्ये किती बदल झाला?...

Demonetisation: नोटाबंदीला पाच वर्षे पूर्ण, रोख आणि डिजिटल व्यवहारांमध्ये किती बदल झाला? जाणून घ्या

Subscribe

Five years of Demonetisation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी देशात नोटाबंदीची घोषणा केली, त्यानंतर त्याचदिवशी मध्यरात्रीपासून  ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. नोटाबंदीनंतर या पाच वर्षांत व्यवहारांमध्ये किती बदल झाले ते जाणून घेऊया?

आकडेवारीवर नजर टाकली असता, नोटाबंदीच्या पाच वर्षानंतरही देशात चलनी नोटांचा ट्रेंड वाढत आहे. तसेच डिजिटल पेमेंट देखील वेगाने वाढत आहे. यामुळे लोकांचा कॅशलेस पेमेंटकडे कल वाढताना पाहयला मिळतोय. मोदी सरकारने नोटाबंदीमध्ये ५०० आणि १०० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसांनी सरकारने २००० आणि ५०० रुपयांची नवी नोट जारी केली. त्यानंतर २०० रुपयांची नोटही चलनात आली.

- Advertisement -

नोटाबंदीनंतर पुढील काही महिने देशात घबराटीचे वातावरण होते. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर लांबच लांब रांगेत लावल्या. यामुळे काळा पैसा संपेल आणि रोखीचे चलन कमी होईल, असे सांगण्यात आले.

चलनाच्या मूल्यात झाली मोठी वाढ

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, नोटाबंदीपूर्वी म्हणजे ४ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात चलनात असलेल्या एकूँण चलनी नोटांचे मूल्य १७.७४ लाख कोटी रुपये होते. पण यावर्षी २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ते २९.१७ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर चलनी नोटांच्या मूल्यात सुमारे ६४ टक्के वाढ झाली आहे.

- Advertisement -

गेल्या एका वर्षाच्या तुलनेत ३० ऑक्टोबर २०२० रोजी चलनात असलेल्या नोटांचे मूल्य २६.८८ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरात नोटांचे चलन सुमारे ८.५ टक्क्यांनी वाढले आहे.

३१ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात चलनात असलेल्या नोटांच्या मूल्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा वाटा ८५.७ टक्के आहे. मात्र हे खरे आहे की, देशात २०१९-२० आणि २०२००२१ मध्ये २००० रुपयांच्या नवीन नोटा छापल्या गेल्या नाहीत.

विशेषत: गेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये चलनी नोटांच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या मागचे कारण म्हणजे, कोरोना काळात अनेकांनी सावध पवित्रा घेत पुढे कोणताही त्रास होऊ नये म्हणून बरीच रोकड बँकेतून आणि इतर ठिकाणाहून काढून घेतली,

डिजिटल पेमेंटमध्ये वाढ

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, या काळात देशात डिजिटल व्यवहारांमध्येही वाढ झाली आहे. क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग, युनिफाइड पेमेंट इंटरफेस या सर्व माध्यमांमुळे डिजिटल पेमेंट वाढीला चालना मिळाली. दरम्यान UPI ऑनलाईन पेमेंट सेवा २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. ऑक्टोबर २०२१1 मध्ये सुमारे ७.७१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या महिन्यात एकूण ४२१ कोटी व्यवहार झाले.

नोटाबंदीचा तात्कालीन परिणाम

नोटाबंदीमुळे रोख रकमेची मोठी कमतरता जाणवत होती. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात चलनी नोटांचे चलन १७.९७ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर होते. नोटाबंदीनंतर २५ नोव्हेंबर २०१६ रोजी ते ९.११ लाख कोटी रुपयांवर आले. नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर लोकांकडे असलेले चलन, जे ४ नोव्हेंबर २०१६ रोजी १७.९७ लाख कोटी रुपये होते, ते जानेवारी २०१७ मध्ये ७.८ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले.

सिस्टममध्ये परत आले पैसे

रिझर्व्ह बँकेच्या २०१८ च्या अहवालात सांगण्यात आले की, नोटाबंदीनंतर सुमारे ९९ टक्के चलन सिस्टममध्ये परत आले आहे. एवढेच नाही तर प्रॉपर्टीसारख्या अनेक क्षेत्रात रोखीचे व्यवहार कमी झाले नाहीत. डिसेंबर २०१८ आणि जानेवारी २०१९ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने सहा शहरांमध्ये केलेल्या प्रायोगिक सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, लोक नियमित खर्चासाठी व्यवहारांपेक्षा रोख रकमेला प्राधान्य देतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -