घरदेश-विदेशअमेरिकेचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदरची कमाई छप्पर फाडके

अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदरची कमाई छप्पर फाडके

Subscribe

फोर्ब्सने नुकतीच हायेस्ट पेड स्टार खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली होती, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूची कमाई ऐकून थक्क होण्यास होते. अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदर याने २०१७ मध्ये तब्बल १९१३.३ कोटींची कमाई केली असून, त्यातील १६०५ कोटी रुपये त्याने अवघ्या ३६ मिनिटांत कमावले आहेत.

२७ ऑगस्ट २०१७ ला लास वेगास येथे झालेल्या हाय प्रोफाईल सामन्यात मेवेदरने कॉनोर मेकग्रेगर याला अवघ्या ३६ मिनिटांत पराभूत केले. या सामन्यासाठी ६०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४ हजार कोटी रु. पणाला लागले होते. मेवेदरने हा सामना जिंकून १६४५ कोटीं रुपये कमावले. २२० देशांत या लढाईचे थेट प्रक्षेपण केले गेले होते. यापूर्वी एका वर्षात १० आकडी कमाई करण्याची कामगिरी बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन आणि गोल्फपटू टायगर वूड्स यांनी बजावली होती. त्या यादीत आता मेवेदर समाविष्ट झाला आहे.

- Advertisement -

मेवेदरला त्याच्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याचा छंद आहे. नोटांच्या ढिगावर लोळत असल्याचे त्याचे फोटो अनेकदा प्रसिद्ध होतात. सोशल मीडियावर तो खूपच अॅक्टीव्ह आहे. प्रोफेशनल करियरमध्ये त्याचा एकही पराभव झालेला नाही. त्याने आत्तापर्यंत ५० फाईट खेळल्या आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. त्यात त्याने प्रतिस्पर्ध्याला २७ वेळा नॉकआऊट केले आहे. आता त्याने बॉक्सिंगमधून संन्यास घेतला आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -