घरदेश-विदेशमध्य प्रदेशमधील कार अपघातात ४ हॉकीपटूंचा मृत्यू; तिघे जखमी

मध्य प्रदेशमधील कार अपघातात ४ हॉकीपटूंचा मृत्यू; तिघे जखमी

Subscribe

मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्य तीन खेळाडू जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ वर रैसलपूर गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त स्वीफ्ट डिझायर कारमध्ये एकूण सात खेळाडू होते. हे सर्व खेळाडू मध्य प्रदेश हॉकी अकादमीचे होते. ध्यानचंद हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते होशंगाबादला आले होते. इटारसीच्या दिशेने जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार एका झाडावर जाऊन आदळली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार

स्पर्धेत सहभागी झालेल्या काही खेळाडूंची राहण्याची व्यवस्था इटारसी येथे करण्यात आली होती. मात्र तिथे जातानाच ही दुर्घटना घडली. शाहनवाझ खान, आदर्श हरदुआ, आशिष लाल आणि अनिकेत अशी मृत खेळाडूंची नावे आहेत. तर जखमी खेळाडूंची ओळख अद्याप पटलेली नाही.

- Advertisement -

होशंगाबाद प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. चौहान यांनी मृत खेळाडूंची नावे ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा –

आरे जंगल वाचवणारच – तेजस ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -