घरदेश-विदेशकेरळ एक्स्प्रेसमधील ४ प्रवाशांचा उष्माघाताने मृत्यू

केरळ एक्स्प्रेसमधील ४ प्रवाशांचा उष्माघाताने मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशच्या आगरा आणि झासी स्टेशनच्यामध्ये केरळ एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्या ४ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशातल्या अनेक राज्यांमध्ये तापमान वाढ झाली असून उकाड्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. वाढते तापमान आणि उन्हाने आतापर्यंतचा तर रेकॉर्ड तोडला आहे. ट्रेनमधून स्लीपरने प्रवास करणाऱ्या लोकांची अवस्था गर्मीमुळे खूप खराब झाली आहे. या कडाक्याच्या उन्हाने केरळ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या ४ प्रवाशांचा बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या आगरा आणि झासी स्टेशनच्यामध्ये केरळ एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्या ४ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर भारतामध्ये भीषण उष्णतेने लोकांचे आरोग्य खराब होत आहे. सोमवारी मथुराचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस होते. तर बांदाचे तापमान ४९.२० डीग्री सेल्सिअस होते.

गर्मीमुळे ५ प्रवाशांची प्रकृती बिघडली

केरळला जाणारी ट्रेन निजामुद्दीनवरुन त्रिवेंद्रम येथे जात होती. आगरावरुन निघाल्यानंतर ट्रेन मध्ये मध्ये उभी राहत होती. त्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांना खूप गरम होत होते. अशामध्ये गर्मीमुळे ५ प्रवाशांची प्रकृती बिघडली. त्यामधील ४ जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांच्या मृत्यूची माहिती कळताच खळबळ उडाली. मृत प्रवाशांचे मृतदेह झाशी रेल्वेस्टेशनवर उतरवण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूबाबतची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून खरे कारण स्पष्ट होईल

दरम्यान, रेल्वे प्रशासन याबाबत काहीच बोलण्यास तयार नाही. उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ट्रेन काही तांत्रिक कारणांमुळे लेट झाली. मात्र मृत प्रवाशांची प्रकृती आधीपासूनच खराब होती. आतापर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

काशी आणि आगरा फिरण्यासाठी आले होते

तामिळनाडूवरुन ६८ पर्यटकांचे एक पथक वाराणसी आणि आगरा फिरण्यासाठी आले होते. वाराणसी फिरल्यानंतर ते आगरा येथे आले. तिथे फिरल्यानंतर सोमवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी तामिळनाडूला परत जाण्यासाठी गाडी पकडली. सर्व पर्यटकांनी आगार येथून केरळ एक्स्प्रेसमध्ये बसले. ते सर्व जण स्लीपर कोचमधून प्रवास करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -