घरदेश-विदेशGaganyaan mission: 'गगनयान' मोहिमेत 'हे' चार अंतराळवीर, पंतप्रधान मोदींनी केली नावांची घोषणा

Gaganyaan mission: ‘गगनयान’ मोहिमेत ‘हे’ चार अंतराळवीर, पंतप्रधान मोदींनी केली नावांची घोषणा

Subscribe

बंगळुरू : चांद्रयान – ३ मोहीम आणि आदित्य L – १ च्या यशानंतर आता माणसाला अंतराळात पाठवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. इस्त्रोने यासंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या या भारतीय अंतराळवीरांची नावे समोर आली आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित क्रिष्णन, ग्रुप कॅप्टन अंगत प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी अंतराळवीरांची नावे आहेत.

- Advertisement -

…तर भारत हा चौथा देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गगनयान मिशनमधील अंतराळवीरांची बंगळुरुतील विक्रम साराभाई अंतराळ स्टेशन येथे जाऊन भेट घेतली. सहभागी झालेले चौघेही विंग कमांडर्स किंवा ग्रुप कॅप्टन आहे. या चारही अंतराळवीरांना बेंगळुरुतील संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. गगनयान मिशन हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. भारत यात यशस्वी झाला तर अंतराळात माणसाला पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल.

हेही वाचा – Manoj Jarange : मी दिलगिरी व्यक्त करतो; एसआयटी चौकशी लागू होताच जरांगेंना उपरती!

- Advertisement -

निवड प्रक्रियेतून चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. २०२१ मध्ये त्यांचे प्रशिक्षण संपले. मात्र, कोरोनामुळे यासाठी जास्त वेळ लागल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी मोदींनी ही वेळही आपलीच आहे. आजची पिढी भाग्यवान आहे, असं विधान केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हिएसएससीमधील ट्राइयोसोनिक विंड टनेल, तामिळनाडूतील महेंद्रगिरीमधील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समधील सेमी क्रायोजेनिक इंटीग्रेटेड इंजिनासंबंधी विभाग आणि सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रामधील पीएसएलव्ही एकीकरण विभागाचं उद्घाटन केलं.

हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, म्हणाले – “जरांगेंच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -