घरदेश-विदेशखुशखबर! सोन्याचा भाव घसरला

खुशखबर! सोन्याचा भाव घसरला

Subscribe

सोन्याचा भाव गेल्या सात दिवसात १२२० रुपयांनी घसरला आहे. बुधवारी म्हणजे सोमवारी सराफ बाजारात सोन्याचा भाव ३३ हजार ४३० रुपये प्रति १० ग्राम असा आहे.

सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी समोर येताना दिसत आहे. सराफ बाजारात सोन्याचा भाव खाली घसरला आहे. त्यामुळे या संधीचा चांगला फायदा ग्राहकांना होणार आहे. बुधवारी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा भाव २० रुपयांनी घसरला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याचा भाव १२२० रुपयांनी घसरला आहे. सध्या सराफ बाजारात सोन्याचा भाव ३३ हजार ४३० रुपये प्रति १० ग्राम असा आहे. दरम्यान, चांदीच्या भावात अध्याप कुठलाही बदल झालेला नाही. चांदीचा भाव ३९ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. यासंदर्भातील माहिती ऑल इंडिया सराफ असोसिएशनने दिली आहे.

…म्हणून सोन्याचा भाव घसरला

सोने व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज लोकल ज्वेलर्स मालकांनी जास्त खरेदी केलेली नाही, त्यामुळे सोन्याचा भाव कमी झाला आहे. नवी दिल्लीमध्ये ९९.९ टक्क्यांनी शुद्ध असेलेले सोने २० रुपयांनी घसरले आहे. तर, ९९.५ टक्क्यांनी शुद्ध असलेल्या सोन्याचा भाव ४० रुपयांनी खाली घसरला आहे. ९९.९ टक्क्यांनी शुद्ध असलेल्या सोन्याचा दर हा ३३ हजार ४३० रुपये इतका आहे. तर, ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा दर हा ३३ हजार २६० रुपये इतका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -