घरमहाराष्ट्रराफेलची गोपनीय कागदपत्रे चोरीला जातातच कशी - जयंत पाटील

राफेलची गोपनीय कागदपत्रे चोरीला जातातच कशी – जयंत पाटील

Subscribe

केंद्र सरकार आपण केलेला घोटाळा दडवण्यासाठी शेवटी कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

राफेल खरेदीची गोपनीय कागदपत्रे चोरीला जातातच कशी? असा सवाल करत चौकीदारच चोर आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. राफेल खरेदीची गोपनीय कागदपत्रे चोरीला गेली हे महाधिवक्ता वेणुगोपाळ यांनी कोर्टात दिली. यामुळे पुन्हा एकदा राफेलप्रकरण तापले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

हे वाचा – राफेलची कागदपत्रे चोरीला; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती 

- Advertisement -

केंद्र सरकार आपण केलेला घोटाळा दडवण्यासाठी शेवटी कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगायला लागले आहे. केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली अत्यंत महत्वाची कागदपत्रे चोरीला जातात कशी? हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या त्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवली पाहिजे, असे सरकार बोलते त्याच सरकारच्या ताब्यातील फाईल गहाळ केली जाते. याचा अर्थ काय घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित करतानाच चौकीदारच चोर आहे हे नक्की, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत दिली. राफेल खरेदीची इतकी गोपनीय कागदपत्रे चोरीला जातातच कशी असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -