घरताज्या घडामोडीगोरखनाथ मंदिर - मुस्लीमांवर अन्याय होत असल्यानेच केला हल्ला- मुर्तजाची कबुली

गोरखनाथ मंदिर – मुस्लीमांवर अन्याय होत असल्यानेच केला हल्ला- मुर्तजाची कबुली

Subscribe

देशात मुस्लीमांवर अन्याय होत असल्याच्या रागातूनच गोरखनाथ मंदिराबाहेरील पोलिसांवर हल्ला केल्याची कबुली आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी याने दिली आहे. काही दिवसांपूर्वी गोरखनाथ मंदिराबाहेर तैनात असलेल्या पोलिसांवर मुर्तजा याने धारदार शस्त्राने हल्ला करत अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून त्याची गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. हा हल्ल्यामागे दहशतवादी संघटनांचा हात आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे.

यावेळी मुर्तजा याने चौकशी करताना अधिकाऱ्यांना सांगितले की देशात मुस्लीम समाजावर अन्याय होत आहे. CAA-NRC हे देखील चुकीचे आहे. याचाच राग आल्याने पोलीसांवर हल्ला केल्याचे त्याने सांगितले. तसेच कर्नाटक, नेपाळमध्येही मुसलमानांबरोबर अन्याय होत आहे. हेच आपल्या डोक्यात आहे.

- Advertisement -

गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणानंतर उत्तर प्रदेशमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुर्तुजा हा मुंबईतील आयआय़टीमध्ये शिकलेला आहे. असे त्याने सांगितले असून चौकशीदरम्यान मुर्तजा अनेकवेळा असंबंध बोलत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. बुधवारी लखनौच्या एटीएसने त्याची चौकशी केली. त्यावेळी आपल्याला मानसिक आजार जडल्याचे त्याने सांगितले. बऱ्याचवेळा तो विषय सोडून भलतेच काही बरळतही होता. पण अधिकाऱ्यांनी यातील सत्यता पडताळण्यासाठी त्याचे सर्व विधान रेकॉर्ड केले असून तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना हे देखील तपासले जाणार आहे. तसेच नेपाळी करन्सी, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, लॅपटॉप व इतर सामान त्याच्याकडून जप्त करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात मुर्तजा नेपाळ, मुंबई, कोईम्बतुर , जामनगर आणि गाजीपुर येथेही वास्तव्य केले होते. एटीएस त्याचाही तपास करत असून मुर्तजा कोणत्या दहशतवादी संघटनेसाठी काम करतोय हे याचाही तपास केला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -