घरदेश-विदेशराहुल गांधी ४९ वर्षाचे झाले; संपूर्ण भारतातून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

राहुल गांधी ४९ वर्षाचे झाले; संपूर्ण भारतातून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Subscribe

राहुल यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. राहुल यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे. महत्वाचे म्हणजे प्रत्येकासाठी त्यांचा वाढदिवस हा खासच असतो, पण राहुल गांधींसाठी आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसाठी हा वाढदिवस एकदम ‘स्पेशल’ आहे. त्याचे कारणही तसेच आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा वाढदिवस आहे. म्हणूनच हा वाढदिवस ‘स्पेशल’ म्हंटला जात आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर विशेष सजावट करण्यात आली आहे. तसेच शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज देखील झळकले आहेत. देशभरातून राहूल यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -