घरदेश-विदेशमोदींनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोदींनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Subscribe

आपल्या खास शुभेच्छांसह राहुल गांधी यांना आरोग्यदायी दीर्घायू लाभो अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. राहूल गांधी यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे. लोकसभा २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राहूल गांधीनी निवडणूक लढवली होती. पंतप्रधानांनी ट्विट करून आपल्या खास शुभेच्छांसह राहुल गांधी यांना आरोग्यदायी दीर्घायू लाभो अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.

- Advertisement -

राहूल गांधी आज सकाळी १० वाजता काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत भेट घेऊ शकतात. १९ जून १९७० यावर्षी जन्म राहूल गांधीचा जन्म झाला असून, राहूल गांधी यांनी पहिल्यांदा लोकसभेच्या अमेठी आणि वायनाड या दोन जागेवरून निवडणूक लढवली होती. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या अमेठीमध्ये त्यांनी भाजप नेता स्मृती इराणी यांच्या विरूद्ध सामना करत वायनाडमधून त्यांना विजय मिळाला होता.

यावेळी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह गांधींचा ४९ वा वाढदिवस संस्मरणीय बनवण्याची योजना आखली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -