घरदेश-विदेश...म्हणून वाराणसीमधून लढवली नाही निवडणूक

…म्हणून वाराणसीमधून लढवली नाही निवडणूक

Subscribe

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. तेव्हापासून प्रियंका गांधी यांनी वारणसी येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे.

त्यानंतर वाराणसी येथून निवडणूक का लढवली नाही, याचे कारण प्रियंका गांधी यांनी दिले आहे. माझ्या खांद्यावर संपूर्ण उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी आहे. एका नाही तर 41 मतदारसंघांत पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे एका ठिकाणी राहून मला हे शक्य होणार नाही, असे प्रियंका गांधी म्हटले आहे.

- Advertisement -

28 मार्च रोजी रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी या गेल्या असता कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती त्यांना केली. त्यावेळी निवडणूक लढवायची तर मी वाराणसी येथून लढवू का असा प्रतिप्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला होता. ही चर्चा अनौपचारिक स्वरूपाची होती. मात्र त्यानंतर प्रियंका गांधी या खरोखरच वाराणसी येथून निवडणूक लढवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

तसेच प्रियंकांनी वाराणसी येथून निवडणूक लढवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व शक्यतांना पूर्णविराम देताना काँग्रेसने वाराणसी येथून अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -