घरCORONA UPDATECovid-19 : कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर संसर्गापासून कसे कराल संरक्षण? वाचा, आरोग्य तज्ज्ञांचा...

Covid-19 : कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर संसर्गापासून कसे कराल संरक्षण? वाचा, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

Subscribe

कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होता का? याविषयी अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे. परंतु हे प्रश्न पडणे साहाजिक आहे कारण कोरोनाविरोधी लसीकरणानंतरही कोरोना संसर्ग होत असल्याच्या घटना समोर आल्यात. तसेच देशातील लस निर्मित करणाऱ्या कंपन्यांनीही कोरोना रोखण्यासाठी कोणतीही लस पूर्णपणे प्रभावी नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना लस फक्त नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढत असून विषाणूविरोधात लढण्यासाठी ताकद देत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची गती रोखण्यासाठी फक्त लस काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्गापासून आपले संरक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी आरोग्य तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे.

लसीकरणानंतर काही आठवडे घरीच थांबा

याविषयावर बोलताना सफदरजंग रुग्णालयाचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख प्राध्यापक आणि डॉक्टर जुगल किशोर म्हणाले की, लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीने दुर्लक्ष केले तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लसीचा डोस घेतल्यानंतर आपण एका ते दोन आठवड्यांपर्यंत स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवल्यास संसर्ग होण्याची शक्यता टाळली जाऊ शकते. ही युक्ती दोन प्रकारे प्रभावी ठरेल. पहिली म्हणजे, जर ती व्यक्ती बाहेर गेलीच नाही तर त्याला बाहेरून संक्रमण होणार नाही. आणि दुसरी म्हणजे, जरी ती व्यक्तीला इतर कोणत्याही मार्गाने कोरोना संक्रमण झाले तरी बाहेर न पडल्यामुळे इतरांना तिच्यामुळे संसर्ग होण्याचा धोका टळेल. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते. जर दोन आठवड्यांच्या दरम्यान आरोग्य स्थिती बिकट झाली नसेल आणि सर्व काही सामान्य राहिले तर तो व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते.

- Advertisement -

भारतात लसीकरणानंतर संक्रमणाची अधिक संख्य़ा कारण लोकसंख्या अधिक 

लसीकरणानंतरही मोठ्याप्रमाणात कोरोना संक्रमित झालेल्या लोकांबद्दल सांगताना डॉ. जुगल किशोर म्हणाले की, या लसींचा चांगला प्रभाव फक्त १० टक्के लोकांमध्ये दिसत असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते. हे केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. भारतात लसीकरणानंतरही संक्रमित होणाऱ्यांची संख्या अधिक आहे कारण भारताची लोकसंख्या इतर देशांपेक्षा अधिक आहे. डॉ. जुगल किशोर यावर पुढे सांगतात, लोकांनी लसीबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. कारण लस घेतल्यानंतर गंभीर पातळीवरील कोरोना संक्रमणाचा धोका कमी होते. त्यामुळे लसीचा एकच डोस लोकांना कित्येक महिन्यांपर्यंत कोरोना संसर्गापासून संरक्षण देत आहे. त्यामुळे लोकांनी लसीचा कमीतकमी एक डोस घेतला पाहिजे असेही म्हणाले.

कोरोनामुक्त नागरिक ६ आठवड्यांनी घेऊ शकत लस 

दरम्यान कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर ६ आठवड्यानंतर नागरिक लस घेऊ शकतात असेही डॉ. किशोर म्हणाले. परंतु जर केंद्रावर लसीचा पहिला डोस घेतलेली लस दुसऱ्या डोस घेण्याच्यावेळीस उपलब्ध नसल्यास दोन वेगवेगळ्या कंपनीची लस दिली जाऊ शकते का?असे विचारले असता यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यांच्या मते, सर्व लसींचे सूत्र वेगळे आहे. म्हणूनच, त्या व्यक्तीने त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा ज्याचा त्याने पहिला डोस घेतला. तथापि, रशियाची स्पुतनिक-व्ही लस त्याच फॉर्म्युलावर आधारित आहे. ज्याअंतर्गत भारताची स्वदेशी लस तयार केली गेली आहे. परंतु असे लसींचे कॉकटेल टाळण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

डॉ, किशोर सांगतात, स्पुटनिक लसीचा एकच डोस देण्यात येत आहे. परंतु येत्या काही दिवसांत या लसीचाही दुसरा डोस देण्याचीही अपेक्षा आहे. फायझर कंपनीच्या लशीबाबतही असेच घडत आहे. त्यांनी असेही नमूद केले की, लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्याने लसीच्या तुटवड्यावर मात करत येईल आणि लसींची कार्यक्षमता वाढवता येईल.यामुळे अधिकाधिक नागरिकांनी कोरोनाविरोधी लस घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.


ऑनलाईन ट्रान्सफर करताना पैसे चुकीच्या खात्यात गेले? घाबरु नका, ‘असे’ मिळवा पैसे परत


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -