घरदेश-विदेशतर मोदींनी तुरुंगात जावे लागेल - राहुल गांधी

तर मोदींनी तुरुंगात जावे लागेल – राहुल गांधी

Subscribe

राफेल प्रकरणाची चौकशी सुरु झाली तर मोदींना तुरुंगाची हवा खावी लागेल, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी इंदूर येथे केले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल विमान खरेदी प्रकरण हे ‘ओपन अँड शट केस’ असून या कराराची चौकशी झाली तर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जावे लागेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. इंदोर येथे काही निवडक पत्रकारांशी राहुल गांधी बोलत होते. यावेळी ‘चौकीदार चोर है’ या शब्दप्रयोगाबद्दल राहुला गांधीना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “मोदींना भ्रष्टाचारी म्हटलं जात नाही, तर ते भ्रष्टाचारीच आहेत. याबाबत कोणताही संभ्रम नसून राफेल केस ही ओपन अँड शट केस आहे. ज्यादिवशी राफेल कराराची चौकशी सुरु होईल, त्यानंतर मोदी तुरुंगात जातील. यापेक्षा जास्त काही होणार नाही.”

त्यापुढे जात राहुल गांधी म्हणाले की, राफेल करारात सर्व कायदेशीर प्रक्रिया बाजुला सारत फक्त अनिल अंबानी यांच्या कंपनीला फायदा मिळवून दिला गेला. राफेल पेक्षाही अनेक मोठी प्रकरणे आहेत, जी बाहेर येणे बाकी असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

- Advertisement -

सबरीमाला मंदिराच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याबाबतीत राहुल गांधी यांचे मत यावेळी जाणून घेण्यात आले. त्यावर गांधी म्हणाले की, स्त्री आणि पुरुष समान असून त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार असला पाहीजे. माझ्या पक्षाची भूमिका विचाराल तर सबरीमाला मंदिराला घेऊन केरळमधील स्त्री आणि पुरुष कमालीचे भावनिक आहेत. त्यामुळे माझ्या आणि पक्षाच्या भुमिकेत फरक आहे. पण माझा फक्ष केरळातील जनतेचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे त्यांच्या भावनांच्या सोबत मी आहे.

- Advertisement -

तसेच राम मंदिराच्या बाबतीत भाजप अध्यादेश काढू शकते का? याबाबतही पत्रकारांनी गांधी यांना छेडले असता ते म्हणाले की, “और बचा क्या है, कुछ नही बचा है.” बहुतेक राम मंदिराच्या विषयाशिवाय भाजपकडे कोणताही विषय उरलेला नाही, असे त्यांना सुचवायचे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -