घरदेश-विदेशभारतातून २० मेपर्यंत कोरोना होणार हद्दपार; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा दावा

भारतातून २० मेपर्यंत कोरोना होणार हद्दपार; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा दावा

Subscribe

कोरोना व्हायरस लवकरात लवकर भारत देशासह वेगवेगळ्या देशांमधूनही हद्दपार होऊ शकतो.

भारतातून २० मेपर्यंत जीवघेणा कोरोना व्हायरसचा सर्वनाश होऊन तो हद्दपार होण्याची शक्यता आहे. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अँड डिझाइनने (SUTD) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संकलित केलेल्या माहिती आणि आकडेवारीच्या विश्लेषणानुसार हा दावा केला आहे. तसेच एसयूटीडीने असेही म्हटले आहे की, कोरोना व्हायरस लवकरात लवकर भारत देशासह वेगवेगळ्या देशांमधूनही हद्दपार होऊ शकतो.

शुक्रवारी सरकारकडून सांगण्यात आले होते की, लॉकडाऊन ३ मेपर्यंतच्या पुढे वाढवला तर कोरोनाचे रुग्ण आढळणार नाहीत, असे केल्याने कोरोना व्हायरसवर भारत लवकर नियंत्रण मिळवू शकेल, असा दावा देखील करण्यात आला आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाकडून अत्यावश्यक सेवांसह काही दुकानं उघडण्याची परवानगी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये देण्यात आली आहे. मात्र कॅन्टोनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रात दुकाने उघडण्यास परवानगी नाही. याशिवाय दारूची दुकाने आणि मॉलची दुकानेही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.

- Advertisement -

केंद्राचा लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय, पण…. महाराष्ट्रात दुकाने सुरु होणार नाहीत!

चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरात प्रचंड विनाश झाला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या २५ हजारांपेक्षा सर्वाधिक आहे, त्यापैकी ८२४ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यापैकी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ५ हजार ८०३ रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे.

देशातील गेल्या २४ तासांत १ हजार ९९० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ हजार ४९६ वर पोहोचला आहे. यामध्ये १९ हजार ८६८ रुग्ण कोरोनाबाधित असून ५ हजार ८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -