घरताज्या घडामोडी'हे माझं पहिलं कर्तव्य', जगात भारतीय वंशाच्या 'या' व्यक्तीला पहिली लस

‘हे माझं पहिलं कर्तव्य’, जगात भारतीय वंशाच्या ‘या’ व्यक्तीला पहिली लस

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान अनेक देशात कोरोना लस विकसित करण्याचे काम सुरू आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाला आता सुरुवात झाली आहे. उत्तर-पूर्वी इंग्लंडमधील भारतीय वंशाचे ८७ वर्षी हरि शुक्ला (Hari Shukla) कोरोना लस घेणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. हरि शुक्ला यांना फायझर आणि बायोटेक (Pfizer-BioNtech)ने विकसित केलेली कोरोना लस देण्यात आली. शुक्ला म्हणाले की, ‘कोरोना लसीचे पहिले दोन डोस घेणे हे माझे कर्तव्य आहे, असे त्यांना वाटते.’

- Advertisement -

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना या क्षणाला ‘एक मोठी प्रगती’ म्हटले आणि मंगळवारी ब्रिटनमध्ये को ‘वी-डे’ किंवा ‘व्हॅक्सीन डे’ असल्याचे सांगितले. त्यामुळे आज ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी भारतीय वंशाचे हरिश शुक्ला यांना पहिली कोरोनाची लस देण्यात आली आहे. माहितीनुसार ब्रिटनमध्ये लसीकरणाच्या पहिला आठवड्यात सुमारे ८ लाख डोस उपलब्ध होतील. लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात ९५ टक्के प्रभावी ठरलेल्या लसीचे डोस ब्रिटन सरकारने ४० लाख खरेदी केले आहेत.

भारतीय वंशाचे लस घेणारे हरि शुक्ला म्हणाले की, ‘मी खूप खुश आहे, आपण जागतिक महामारीच्या शेवटच्या टप्प्याकडे जात आहोत आणि मी लस घेऊन, आपली जबाबदारी पार पाडत आहे. माझे हे कर्तव्य आहे आणि मदतीसाठी जे काही करायला लागले ते मी करेल. राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस)सोबत सतत संपर्कामध्ये असल्यामुळे मला माहित आहे की, त्या सर्वांनी किती कठोर परिश्रम केले आहेत आणि त्या सर्वांचा खूप आदर आहे. जागतिक महामारी दरम्यान आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी जे काही केले आहे, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – फायझर, सीरमनंतर स्वदेशी कंपनीचाही आपत्कालीन वापरासाठी DCGI कडे अर्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -