घरदेश-विदेशनोकरीची संधी! ‘Indian Oil’ सुरू करतय १.०४ लाख कोटींचे नवीन प्रकल्प!

नोकरीची संधी! ‘Indian Oil’ सुरू करतय १.०४ लाख कोटींचे नवीन प्रकल्प!

Subscribe

या लॉकडाऊनच्या काळात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने तब्बल १.०४ लाख कोटी रूपयांच्या नव्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात त्यामुळे हजारो नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२०२० – २१ वर्षात कंपनीने २६,१४३ कोटी रूपये खर्च करणार आहे. केंद्र सरकारनेही या कंपनीला गुंतवणूक वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. खर्च वाढला तर वस्तूंना मागणी वाढेल, उत्पादन वाढेल, त्यामुळे बाजारात पैसे येतील आणि बाजारात पैसे आले की अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर येण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ३३६ योजनांवर कामही सुरू केलं आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे देशाच्या आणि सर्वच जगाच्याच अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च होणार हे लक्षात घेऊन त्या दृष्टिनेही सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत.


हे ही वाचा – संतापजनक! पोलिसाने अधिकारी महिला पोलीसाचा केला विनयभंग!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -