घरदेश-विदेशIndian Railway : सप्टेंबर महिन्यापासून सुरु होणार 'या' फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन, पाहा...

Indian Railway : सप्टेंबर महिन्यापासून सुरु होणार ‘या’ फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन, पाहा लिस्ट

Subscribe

प्रवाशांची मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वे प्रशासनानमार्फत वेगवेगळ्या रेल्वे परिमंडळामध्ये गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. यात रेल्वे गाड्यांच्या परिचालन कालावधीतही वाढ केली जातेय. यासाठी उत्तर रेल्वेने (Northern Railway)प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील सूचना येईपर्यंत १० फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक

१) ट्रेन नंबर 09027 वांद्रे टर्मिनस – जम्मू तवी फेस्टिव्हल स्पेशल ४ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे.

- Advertisement -

२) ट्रेन क्रमांक 09028 जम्मू तवी – वांद्रे टर्मिनस फेस्टिव्हल विशेष ट्रेन ६ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे.

३) ट्रेन क्रमांक 09017 वांद्रे टर्मिनस – हरिद्वार सुपरफास्ट फेस्टिव्हल ०१ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत चालणार आहे.

- Advertisement -

४) ट्रेन क्रमांक 09018 हरिद्वार – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल २ सप्टेंबरपासून पुढे वाढवण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेता ७ रेल्वे गाड्यांच्या जोड्या म्हणजेच १४ फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण आजपासून म्हणजे २४ ऑगस्टपासून सुरु झाले आहे.

‘या’ गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

१)पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09057 उधना-मंडुआडीह सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ३ सप्टेंबरपासून आणि 09058 मंडुआडीह-उधना सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ५ सप्टेंबरपासून पुढे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२) तर ट्रेन क्रमांक 09271 वांद्रे टर्मिनस – पाटना सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ६ सप्टेंबरपासून आणि 09272 पाटणा – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ८ सप्टेंबरपासून विस्तारित केली जाईल.

३) ट्रेन क्रमांक 02913 बांद्रा टर्मिनस – सहरसा सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ५ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत चालवली जाईल. ट्रेन क्रमांक 02914 सहरसा – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ७ सप्टेंबरपासून पुढे वाढवण्यात येईल.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सर्व विशेष गाड्या पूर्णपणे राखीव आणि विशेष दरांमध्ये धावतील. रेल्वे क्रमांक 09271, 02913, 02929, 09027, 09017, 02905, 09205, 09057 आणि 09424 साठी बुकिंग २४ ऑगस्टपासून प्रवासी आरक्षण केंद्रावर आणि IRCTC च्या वेबसाइटवर सुरू होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -