घरदेश-विदेशIndian Railways मध्ये होणार सर्वात मोठा बदल; ४२ महिन्यांत रचणार विक्रम!

Indian Railways मध्ये होणार सर्वात मोठा बदल; ४२ महिन्यांत रचणार विक्रम!

Subscribe

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सीआयआयच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.

कोरोनादरम्यान भारतीय रेल्वे बदलण्याच्या टप्प्यातून जात असून भारतीय रेल्वेत मोठ्या सुधारणा होत आहेत, तर रेल्वे मंत्रालय सतत नवीन गोष्टींवर प्रयोग करत आहे. अलीकडच्या काळात बॅटरीपासून ट्रेन चालवण्याची बाब असो किंवा २.८ किमी लांबीची मालवाहतूक यशस्वीरित्या चालवण्याच्या यशात असो. मात्र आता रेल्वेने मोठी घोषणा केली असून ती पूर्ण झाल्यानंतर सर्वात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले की, येत्या साडेतीन वर्षांत भारतीय रेल्वे पूर्ण इलेक्ट्रिक रेल नेटवर्क होणार आहे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सीआयआयच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले की, २०२४ पर्यंत रेल्वे १०० टक्के इलेक्ट्रिक रेल नेटवर्क अर्थात रेल्वे संपूर्ण विद्युतीकरण केले जाणार आहे. यामुळे संपूर्ण विद्युतीकरणावर धावणारी भारतीय रेल्वे ही जगातील पहिली रेल्वे ठरेल, जी पूर्णपणे इलेक्ट्रिक पद्धतीने ऑपरेट केली जाईल.

- Advertisement -

ते म्हणाले की, भारतीय रेल्वे वेगाने आपल्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करत आहे. विद्यमान स्थितीत भारतीय रेल्वेच्या ५५ टक्के नेटवर्कचे विद्युतीकरण झाले आहे. आता पुढच्या ३.५ वर्षात उर्वरीत मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यानंतर रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण होईल. सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावतील.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणाच्या योजनेस मान्यता दिली आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत १०० % विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क तयार करण्याच्या मार्गावर आहे. त्याअंतर्गत १२,००,००० किलोमीटरच्या मार्गावर काम केले जाणार आहे. यासह पंतप्रधान मोदींनी ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ला चालना दिली आहे. आम्ही त्यावर काम करतोय. २०३० पर्यंत भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी ग्रीन रेल्वे असेल, अशी अपेक्षा पियुष गोयल यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

दरम्यान, रेल्वेने ४०,००० किलोमीटर विद्युतीकरणाचे (आरकेएम) काम पूर्ण केले आहे. यात ६३ टक्के ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. २०१४-२०२० या कालावधीत १८, ६०५ किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले. तर २००९ -२०१४ दरम्यान रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम फक्त ३८३५ किलोमीटरपर्यंतच झाले होते.


COVID-19 Alert: ‘हे’ आहेत कोरोनाचे ११ लक्षणं; जाणून घ्या, कोणते आहेत धोकादायक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -