घरदेश-विदेशCOVID-19 Alert: 'हे' आहेत कोरोनाचे ११ लक्षणं; जाणून घ्या, कोणते आहेत धोकादायक

COVID-19 Alert: ‘हे’ आहेत कोरोनाचे ११ लक्षणं; जाणून घ्या, कोणते आहेत धोकादायक

Subscribe

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या ११ लक्षणांची यादी जाहीर केली आहे

कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या भारतासह जगभरात प्रत्येक दिवसागणिक वाढत आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे जसे कोरोना संक्रमण वाढत आहे तसतसे भारतातील कोरोना संक्रमित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोना संसर्गाची लक्षणेही वाढत आहेत. सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्गाची केवळ चार लक्षणं होती, जी आता ११ झाली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या ११ लक्षणांची यादी जाहीर केली आहे. कोरोना संसर्गाशी संबंधित काही इतर महत्त्वपूर्ण लक्षणे कोणती आहेत, ते जाणून घेऊया.

- Advertisement -

सुरुवातीला कोरोना विषाणूची केवळ चार लक्षणे होती. ही चार लक्षणे म्हणजे ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दीमुळे वाहणारे नाक किंवा नाक बंद होणं, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणं, मात्र आता कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, त्याच्या लक्षणांची संख्याही वाढत आहे. सध्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाच्या ११ लक्षणांना अधिकृत मान्यता दिली आहे.

हे आहेत नवे लक्षणं

या नव्या लक्षणांमध्ये शरीर दुखणे, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणे, अतिसार, उलट्या आणि कफातून रक्तस्त्राव होणे यांचा समावेश आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, वास न येणं किंवा चव न समजणे हे देखील कोरोना विषाणूचे एक प्रमुख लक्षण आहे. कोरोना विषाणूची इतर लक्षणे ओळखण्यात डब्ल्यूएचओसह जगभरातील संशोधक, वैज्ञानिक आणि डॉक्टरांचा सहभाग आहे. कोरोना विषाणूचे स्वरुप सतत बदलत असल्याचा दावाही बर्‍याच अहवालांमध्ये केला जात आहे. दरम्यान याबद्दल बरेच भिन्न मतं देखील आहेत.

- Advertisement -


प्लाझ्मा डोनेशनसाठी कर्नाटक सरकारचा पुढाकार, दात्याला देणार ५००० रुपये!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -